five storey under construction building collapse in bengaluru
बंगळुरूमध्ये पत्त्यांप्रमाणे कोसळली इमारत By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 3:29 PM1 / 5बंगळुरुतील आयटी हब व्हिटफील्ड परिसरातील शरजाहपूर रोडजवळील कसावनाहल्ली येथे बांधकाम सुरू असलेली 5 मजली इमारत कोसळली आहे. ढिगा-याखाली 18 जण अडकले होते. 2 / 5पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. 3 / 5अथक प्रयत्न करत 7 मजुरांना ढिगा-याखालून जिवंत बाहेर काढण्यात आले. मात्र, तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बचाव पथकाच्या अधिका-यांनी दिली.4 / 5इमारतीचा पाया कमकुवत असल्यानं ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.5 / 5 शहरातील एच.एस.आर लेआउट येथे राहणारा बिल्डर रफ़ीकच्या मालकीची ही इमारती होती. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications