शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Flashback 2020: सरत्या वर्षात देशात घडलेल्या १० महत्त्वाच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:50 AM

1 / 10
नमस्ते ट्रम्प: २४ आणि २५ फेब्रुवारीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी दिल्ली आणि गुजरातला भेटी दिल्या. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये 'नमस्ते ट्रम्प'चं आयोजन करण्यात आलं होतं.
2 / 10
टिकटॉकवर बंदी: १३० कोटी भारतीयांचा डेटा आणि खासगीपणाचे संरक्षण व्हावं, या हेतूनं केंद्र सरकारनं टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चीनला कोट्यवधींचा फटका बसला.
3 / 10
राम मंदिर भूमिपूजन: ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. हे मंदिर १६१ फूट उंच असेल. कोरोनाचं संकट असल्यानं सोहळ्याला कमीत कमी लोक उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.
4 / 10
बाबरी मशीद खटला: बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या खटात सहभागी झाल्याचा वहीम असलेल्या ३२ जणांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयानं ३० सप्टेंबर रोजी निर्दोष मुक्तता केली. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींचा समावेश आहे.
5 / 10
उद्योगांसाठी २० लाखांचं पॅकेज: लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगांचं मोठं नुकसान झालं. या परिस्थितीतून दिलासा मिळावा, या उद्देशानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. जीडीपीच्या सुमारे १० टक्के असं हे पॅकेज होतं.
6 / 10
कर्जे झाली स्वस्त: जानेवारी महिन्यापासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं दोन वेळेला रेपो रेटमध्ये कपात (१.१५ टक्के) केल्यानं बँकांच्या कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात झाली आहे. परिणामी कर्जे स्वस्त झाली.
7 / 10
हाथरस घटना: उत्तर प्रदेशातील हाथरस इथे एका दलित तरुणीवर तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनं देशभरात संतापाची लाट उसळली. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवलं होतं.
8 / 10
शेतकरी आंदोलन: केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केलं असून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या मांडला आहे. कृषी कायदे रद्द करण्याची आंदोलकांची आग्रही मागणी आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
9 / 10
आपनं दिल्ली, भाजप-जेडीयूनं बिहार राखलं: कोरोनानं भारतात चंचूप्रवेश केला असताना फेब्रुवारीत दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली. त्यात आम आदमी पक्षानं ७० पैकी ६२ जागा जिंकत सत्ता कायम राखली. तर कोरोना काळात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयूनं बाजी मारली.
10 / 10
बॉलिवूडवर चौकशीची नशा: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनची जोरदार चर्चा झाली. रिया चक्रवर्तीसह दीपिका पादुकोण, रकूलप्रीत सिंह अशा काही अभिनेत्रींची एनसीबीनं चौकशी केली. पण त्यातून फारसे काही हाती लागले नाही.
टॅग्स :flashback 2020फ्लॅशबॅक २०२०babri masjidबाबरी मस्जिदNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनTik Tok Appटिक-टॉकRam Mandirराम मंदिर