Flashback 2020 A tribute to frontline corona warriors - correct url
Flashback 2020 : कौतुकास्पद! परिस्थिती गंभीर पण "ते" मागे हटले नाहीत, कोरोना योद्ध्यांच्या कर्तव्यनिष्ठेला कडक सॅल्यूट By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 3:16 PM1 / 12देशभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णांचा आकडा 1,02,66,674 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 21,821 नवे रुग्ण आढळून आले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,48,738 लोकांना जीव गमवावा लागला आहे.2 / 12कोरोनाच्या संकटात आपल्या कुटुंबापासून दूर राहून डॉक्टर, पोलीस, परिचारिका, आरोग्य कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. परिस्थिती गंभीर असतानाही ते मागे हटले नाहीत. कोरोना योद्ध्यांच्या कर्तव्यनिष्ठेला कडक सॅल्यूट.3 / 12कोरोनाकाळात डॉक्टरांनी अहोरात्र परिश्रम घेऊन बाधितांना आजारातून बरे केले. या काळात अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधाही झाली. 4 / 12अनेक जणांचा मृत्यूही कोरोनामुळे झाला; पण कोणताही डॉक्टर कोरोनाच्या लढ्यातून मागे हटला नाही, हे विशेष.5 / 12रुग्णालयात दाखल झालेल्या बाधितांची मनापासून सेवा करणाऱ्या परिचारिका कित्येक रुग्णांसाठी देवदूत बनल्या. 6 / 12आपल्या जिवाची पर्वा न करता या परिचारिकांनी सेवा केली.7 / 12कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घरोघरी जाऊन त्याविषयी जनजागृती करण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले. 8 / 12कोरोना साथ आटोक्यात राहण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी मदत झाली.9 / 12कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. 10 / 12लोकांनी सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी पोलिसांनी करडी शिस्त लावली. अनेकांवर पोलिसांनी कारवाईही केली.11 / 12कोरोना बाधितांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी अनेक रुग्णवाहिकांनी जीवाचे रान केले. 12 / 12कोणतीही वाहतूक सुविधा उपलब्ध नसताना कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवले. आणखी वाचा Subscribe to Notifications