शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं नद्यांना पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 3:12 PM

1 / 6
जम्मू-काश्मीरमध्ये सतत दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने झेलमसह इतर सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.
2 / 6
पूरस्थिती लक्षात घेत प्रशासनाने जिल्हा यंत्रणांना दक्षतेच्या सूचना दिल्या असून, प्रसंगी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा व लष्कराला तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
3 / 6
काश्मीर खो-यातील सर्व शैक्षणिक संस्थांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे.
4 / 6
राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी सर्व अधिका-यांची घाईघाईने बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
5 / 6
झेलम नदीची पातळी शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात २३ फुटांवर गेली होती.
6 / 6
झेलमसह अनेक नद्यांचे पाणी लोकांच्या घरांत व जवळच्या गावांमध्ये शिरले आहे.