शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 4:15 PM

1 / 10
माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. ते बिहारमधील बक्सर या लोकसभा मतदारंसघातून आपले नशीब आजमावत आहेत. आसाम-मेघालय कॅडरमधील २०११ आर.आर. च्या बॅचमधील ते आयपीएस अधिकारी आहेत.
2 / 10
अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात असलेल्या आनंद मिश्रा यांनी ७ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. बक्सर येथे शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.
3 / 10
ते बाईक रॅली काढून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, त्याची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शेअर केली आहे. खरे तर मिश्रा यांनी १६ जानेवारी २०२४ पासून आपला राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी स्वेच्छानिवृत्ती पत्रात आसाम सरकारकडे केली होती.
4 / 10
आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजकीय इनिंग खेळण्याचे ठरवले. त्यांनी राजीनामा दिला तेव्हापासूनच ते लोकसभा निवडणूक लढतील अशी अटकळ बांधली जात होती.
5 / 10
राजीनामा दिला तेव्हा मिश्रा आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. आनंद मिश्रा हे मूळचे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील पडसौरा गावचे रहिवाशी आहेत.
6 / 10
त्यांचे संपूर्ण शिक्षण व सांभाळ कोलकाता येथे झाला. आसाममधील डॅशिंग आणि कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकीक मिळवला. येथील नगांव जिल्ह्यात त्यांनी ड्रग्ज माफियांविरुद्ध केलेली कारवाई चांगलीच चर्चेत आली होती.
7 / 10
लक्षणीय बाब म्हणजे आपले खासगी आयुष्य आणि सामाजिक कार्यातील ओढ यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते.
8 / 10
मिश्रा यांच्या वडिलांचे मूळ गाव हे बक्सर जिल्ह्यात आहे. मागील काही महिन्यांपासून माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी बक्सर जिल्ह्यात आपला सक्रिय सहभाग दर्शवल्याचे पाहायला मिळाले.
9 / 10
दरम्यान, बक्सर हा ब्राह्मणबहुल मतदारसंघ असून येथील मागील ७ लोकसभा निवडणुकांपैकी ६ वेळा ब्राह्मण उमेदवार विजयी झाला आहे, तेही भाजपाच्या कमळ चिन्हावर.
10 / 10
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपा नेते अश्विनी चौबे खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या अगोदर भाजपाचे लाल मुनी चौबे हे ४ वेळा येथून संसदेत गेले.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Biharबिहारupscकेंद्रीय लोकसेवा आयोगElectionनिवडणूक