शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खलिस्तानवादी अमृपालसिंगपासून ते सांगलीच्या विशाल पाटलांपर्यंत; हे आहेत निवडून आलेले ७ अपक्ष खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 12:45 PM

1 / 8
लोकसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. तसेच या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर अनेक दिग्गज नेत्यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. देशभरातून एकूण ७ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. या अपक्ष खासदारांची यादी पुढील प्रमाणे...
2 / 8
लडाख लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मोहम्मद हनीफा यांनी काँग्रेसचे उमेदवार शेरिंग नामग्याल यांना पराभूत केले. हनिफा यांनी नामग्याल यांना २७ हजार ८६२ मतांनी पराभूत केले.
3 / 8
बारामुल्ला लोकसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार इंजिनियर अब्दुल राशिद शेख यांनी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फ्रन्सचे नेते सज्जाद गनी लोन यांचा पराभव केला आहे. अब्दुल राशिद शेख यांनी उमर अब्दुल्ला यांना २ लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले.
4 / 8
वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगने खडूर साहिब मतदारसंघातून विजय मिळवला. सध्या आसाममधील तुरुंगात असलेल्या अमृतपाल सिंग याने काँग्रेसचे उमेदवार कुलबीर सिंग जीरा यांना १ लाख ९७ हजार मतांनी विजय मिळवला.
5 / 8
केंद्रशासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत उमेशभाई बाबूभाई पटेल यांनी भाजपाच्या लालूभाई बाबूभाई पटेल यांना ६ हजार २२५ मतांनी पराभूत केले. उल्लेखनीय बाब म्हणजे दमण आणि दीवच्या जागेवर १५ वर्षांनंतर भाजपाचा पराभव केला आहे.
6 / 8
महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपाच्या संजयकाका पाटील यांना एक लाखाहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत केले. विशाल पाटील यांना ५ लाख ७१ हजार मतं मिळाली.
7 / 8
पंजाबमधील फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सरबजीत सिंग खालसा यांनी आम आदमी पक्षाचे करमजीत सिंग अनमोल यांचा ७० हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. सरबजीत सिंग खालसा हा देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारा बेअंत सिंग याचा मुलगा आहे.
8 / 8
पप्पू यादव यांनी बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला २३ हजार ८४७ मतांनी पराभूत केले. पप्पू यादव हे आधीही दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. दोन्ही वेळा पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. १९९१ आणि १९९९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता.
टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्सsangli-pcसांगलीkhadoor-sahib-pcखडूर साहिबpurnia-pcपूर्णिया