Manish Sisodia: मनिष सिसोदिया ते जैन... आत्तापर्यंत तुरुंगात गेलेले 'आप'चे नेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 09:57 IST
1 / 10दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी सीबीआयने कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी सीबीआयने सिसोदिया यांची सुमारे 8 तास चौकशी केली होती. 2 / 10या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. तर आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनीही मनीष सिसोदिया यांच्या अटकेला हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे. 3 / 10दरम्यान, राजधानी दिल्लीत २०१५ मध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आला. तेव्हापासून आजपर्यंत आपच्या अनेक नेत्यांना विविध प्रकरणातून अटक करण्यात आलीय. 4 / 10सिसोदिया यांच्या अगोदर आपचे नेते आणि दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनाही ईडीने गेल्यावर्षी अटक केली आहे. कथित हवाला प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 5 / 10दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना अवैध भरती आणि आर्थिक घोटाळ्यासंदर्भात एका प्रकरणात आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनाही अटक केली होती. सध्या ते जामीनवर बाहेर आहेत. 6 / 10अटक झालेल्या आपच्या नेत्यांमध्ये पंजाबचे आमदार अमिल रतन कोटफट्टा यांनाही लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. 7 / 10 दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन या अटकेचा निषेध केला आहे. त्यांनी हँडलवर लिहिले आहे की, 'मनीष सिसोदिया निर्दोष आहेत. त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण आहे. 8 / 10मनीष यांच्या अटकेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक सर्व पाहत आहे. लोकांना सर्व काही समजत आहे. लोक याचे उत्तर देतील. यामुळे आमचे मनोबल आणखी वाढेल. आमचा संघर्ष आणखी मजबूत होईल.'9 / 10दरम्यान, सीबीआय एफआयआरमधील आरोपी क्रमांक एक असलेल्या मनीष सिसोदिया यांची मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. 10 / 10एका महिन्यानंतर, 25 नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांचे नाव नव्हते, कारण त्यावेळी त्यांच्या आणि इतर संशयित आणि आरोपींविरुद्ध सीबीआयचा तपास चालू होता.