Full Radha in Bihar Assembly, MLAs kicked and punched, allegation by tejaswi yadav
बिहार विधानसभेत फुल्ल राडा, आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 9:01 AM1 / 11बिहारमध्ये राज्य सरकारचं अधिवेशन सत्र सुरू असून मंगळवारी या अधिवेशन सत्रात चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. सुरक्षा रक्षक आणि आमदारांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं2 / 11 विधीमंडळात मंगळवारी विशेष सशस्त्र पोलीस विधेयक 2021 संमत करण्यात आले. त्यानंतर, विरोधकांनी गोंधळ केला. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी हे बिल फाडून अध्यक्षांसमोरच फेकून दिले. 3 / 11 तेजस्वी यादव यांनी अशारितीने आपला विरोध दर्शवल्यानंतर इतर आमदारांनीही या विधेयकाला विरोध असल्याचे सांगत घोषणाबाजी केली. तसेच, वेलमध्ये येऊन आपला विरोध दर्शवला. 4 / 11 सभागृहात गोंधळाची परिस्थिती वाढल्यानंतर पोलीस आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी सभागृहात येऊन आमदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन, आमदारांनी पुन्हा एकदा सरकारविरोधी घोषणबाजी केली.5 / 11 आमदारांना सभागृहाबाहेर घेऊन येतानाची विरोधकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 6 / 11 विधानसभा सभागृहात आमदारांसमवेत करण्यात आलेल्या व्यवहारामुळे राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार सरकारवर जबरी टीका केलीय. नितीश कुमार सरकार हे बलात्काऱ्यांपेक्षाही वाईट असल्याचं आरजेडीने म्हटलंय. 7 / 11 लोकशाहीची माता असलेल्या बिहारमधील लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधानसभेत लोकशाहीला नागवं केलयं. लोकशाहीचा बलात्कार केलाय, अशी गंभीर टीकाही केली. 8 / 11 आमदार महेबुब आलम यांच्यासह अनेक आमदारांचा कुर्ता फाडण्यात आल्याचा आरोप या आमदारांना केला आहे. सरकार वाद-विवाद होऊ देत नसून माफिया राज असल्यागत वागत आहे, असेही ते म्हणाले.9 / 11 अति मागास समाजातून आलेल्या आमच्या महिला आमदारांचे केस ओढण्यात आले. आमच्या आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलाय. 10 / 11 मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी, जवानांनी हे कृत्य केलं असून आम्ही जेव्हा सभागृहात असतो तेव्हा मुख्यमंत्री सभागृहाबाहेर असतात, असेही यादव म्हणाले. 11 / 11 मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी, जवानांनी हे कृत्य केलं असून आम्ही जेव्हा सभागृहात असतो तेव्हा मुख्यमंत्री सभागृहाबाहेर असतात, असेही यादव म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications