शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

G20 मध्ये दिसला 'भाईचारा', राजकीय वैर विसरुन एकत्र आले सत्ताधारी-विरोधी नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 7:21 PM

1 / 8
G20 Dinner Photos: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे G20 पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये जगभरातील राष्ट्रप्रमुखांसह भारतातील अनेक नेते उपस्थित होते. या डिनर पार्टीचे वातावरण इतके आनंददायी होते की, राजकीय प्रतिस्पर्धीही जुन्या मित्रांसारखे भेटले.
2 / 8
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यावेळी उपस्थित होते. पीएम मोदींनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी ओळख करून दिली.
3 / 8
G-20 डिनरमध्ये हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखूदेखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएम सुखूंना मिठी मारली. या फोटोनेही अनेकांचे लक्ष वेधले.
4 / 8
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनदेखील या आयोजनात आले होते. यावेळी मोदींनी त्यांची जो बायडेन यांच्याशी ओळख करून दिली. यावेळी उपराष्ट्रती जयदीप धनखरही उपस्थित होते. उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादानंतर पंतप्रधान मोदींशी त्यांची ही पहिलीच भेट होती.
5 / 8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या G-20 डिनरमध्ये सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही भारत मंडपममध्ये पोहोचल्या होत्या.
6 / 8
यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी IMF उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांच्याशी संवाद साधला. यावेळी निळ्या रंगाच्या साडीत गोपीनाथ खूपच आकर्षक दिसत होत्या.
7 / 8
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यावेळी सिंगापूरच्या पंतप्रधानांशी बोलताना दिसले. दोन्ही नेत्यांनी आसाम सरकार आणि सिंगापूर प्रजासत्ताक यांच्यातील विविध भागीदारींवर चर्चा केल्याचे सरमा यांनी सांगितले.
8 / 8
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या शाही भोजनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला.
टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदdelhiदिल्लीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमNarendra Modiनरेंद्र मोदी