The Ganga Ghat was illuminated by lakhs of lamps
लक्ष दिव्यांनी उजळला गंगा घाट, देवदिवाळीला दिसला काशीचा असा थाट By बाळकृष्ण परब | Published: November 30, 2020 9:15 PM1 / 9देव दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. दरम्यान, यावर्षी देवदिवाळीनिमित्त गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर लाखो दिवे पेटवण्यात आले होते. 2 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेब्रुवारीनंतर वाराणसीत आले होते. लॉकडाऊननंतर मोदी पहिल्यांदाच वाराणसीमध्ये आले होते. या दौऱ्यात मोदींनी ५० किमी प्रवास हवाई मार्गाने तर ४० किमी प्रवास रस्तेमार्गाने केला. 3 / 9 कार्तिक पौर्णिमेला वाराणसीमध्ये देवदिवाळीचे आयोजन हे शेकडो वर्षांपासून होत आले आहे. या दिवशी देवतांनी शिवशंकराच्या नगरीत दिवाळी साजरी केल्याची मान्यता आहे. म्हणून हिला देव दिवाळी म्हणतात. 4 / 9आज काशी श्रद्धेच्या रंगात रंगलेली दिसून आली. मोदींनी आदच्या देवदिवाळी महोत्सवाचे औपचारिक उदघाटन केले. यावेळी मोदींनी मंदिरांच्या संकेतस्थळांचेही उदघाटन केले. 5 / 9 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात जावून पूजा केली. त्यानंतर मोंदींनी कॉरिडॉर प्रोजेक्टचा आढावा घेतला. तसेच दीप दान केले. 6 / 9देवदिवाळीनिमित्त वाराणसीत करण्यात आलेली दिव्यांची सुंदर आऱास. 7 / 9दिव्यांच्या आराशीने उजळलेला गंगा घाट 8 / 9वाराणसीमधील दीपोत्सवाचे एक विहंगम दृश्य 9 / 9वाराणसीमधील गंगा घाट आणखी वाचा Subscribe to Notifications