शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तिसऱ्या स्थानापासून एक पाऊल दूर; लवकरच गौतम अदानी जेफ बेजोसला मागे टाकणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 4:05 PM

1 / 7
जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांचे वर्चस्व आहे. या वर्षी अदानी यांच्या संपत्तीत झालेली वाढ पाहता, ते लवकरच जगातील तिसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याची शक्यता आहे. जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्यावर ते अॅमेझॉनची सर्वेसरर्वा जेफ बेजोस यांना मागे टाकतील.
2 / 7
फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, ज्या वेगाने गौतम अदानी पुढे जात आहेत, ते लवकरच टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या स्थानवर येतील आणि जेफ बेजोस यांनाही मागे टाकतील. दोघांमधील संपत्तीची दरी सातत्याने कमी होत आहे. नुकतीच गौतम अदानी यांची संपत्ती $1.2 अब्जाने वाढून $131.1 बिलियन झाली आहे.
3 / 7
एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 2022 मध्ये मोठी घट झाली आहे. इलोन मस्क यांनी बेजोसकडून सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट हिसकावून घेतल्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आले होते. पण, फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट त्यांच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. जेफ बेझोसची एकूण संपत्ती ते $165.1 अब्ज आहे.
4 / 7
गौतम अदानी हे 2022 मध्ये जगातील सर्वात शीर्ष लोकांमध्ये सर्वाधिक कमाई करणारे ठरले आहेत. ते ता तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अदानी आणि जेफ बेझोस यांच्या संपत्तीतील फरकाबद्दल बोलायचे झाले तर आता त्यांच्या एकूण संपत्तीत केवळ $34 अब्जचा फरक आहे.
5 / 7
गुरुवारी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल झाला आहे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे आता पाचवे श्रीमंत राहिले नसून ते सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती $107 अब्ज आहे. तर, लॅरी एलिसन 107.6 अब्ज डॉलरसह पाचव्या स्थानावर आहे.
6 / 7
टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत अशी दोन नावे आहेत ज्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरपेक्षा कमी आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. अंबानींची एकूण संपत्ती $84 दशलक्षने घसरून $94.7 अब्ज झाली आहे. या आकडेवारीसह, ते 10 व्या क्रमांकावर आहे
7 / 7
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट अजूनही टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्याकडे आहे. त्यांची एकूण संपत्ती $4.8 अब्जने वाढून $278.4 बिलियन झाली आहे. अनुभवी गुंतवणूकदार वॉरेन बफे $ 102.5 बिलियनसह सातव्या क्रमांकावर आले. लॅरी पेज 101.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह यादीत आठव्या स्थानावर आहे.
टॅग्स :Adaniअदानीamazonअ‍ॅमेझॉनelon muskएलन रीव्ह मस्कMukesh Ambaniमुकेश अंबानी