Get well Soon Sir, Netizens pray for nitin Gadkari on Twitter after corona
Get well Soon Sir, ट्विटरवरुन गडकरींसाठी नेटीझन्सची प्रार्थना By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 10:27 PM1 / 11 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.2 / 11 संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि प्रोटोकॉलचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे. 3 / 11गडकरी सध्या विलगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी गृहमंत्री अमित शहांसह केंद्रातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.4 / 11 काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी प्रकृती आता चांगली आहे. 5 / 11 तुमचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी सध्या विलगीकरणात आहे,' असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.6 / 11 नितीन गडकरी हे देशातील मोठे नेते आहेत, तसेच सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळेच, गडकरींच्या कोरोनाची बातमी समजताच ट्विटर ट्रेंड करत आहे.7 / 11Get well soon sir, असा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला असून नेटीझन्सकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. 8 / 11 गडकरी हे केंद्रीय दळणवळण मंत्री असून स्पष्ट आणि कामाला कणखर नेता, म्हणून त्यांची देशात ओळख आहे. रस्ते बांधणीचे मोठे प्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनात चालतात. 9 / 11 आपल्या कामाच्या आणि स्वभावाच्या जोरावर गडकरींनी सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. 10 / 11त्यामुळेच, गडकरींनी लवकरात लवकर कोरोनाला मात देऊन, देशाच्या सेवेत हजर राहण्यासाठी चाहत्यांकडून ट्विटरवरुन प्रार्थना व ट्रेंड सुरू आहे. 11 / 11Get well soon Sir.... chase the corona आणखी वाचा Subscribe to Notifications