शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय रेल्वेकडून महाराष्ट्राला जबरदस्त भेट; देशातील पहिल्या AC Economy Coach मध्ये काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 10:39 AM

1 / 10
देशातील पहिली एसी इकोनॉमी क्लास बोगी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या ट्रेनला लागणार आहे. अनेक टप्प्यातील चाचणीनंतर आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या परवानगीनं रेल्वे कोच फॅक्टरीतून १५ एसी इकोनॉमी बोगी रवाना झाल्या आहेत.
2 / 10
यातील १० बोगी प्रयागराज, आगरा आणि झांशी येथील उत्तर मध्य रेल्वे विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत तर उर्वरित ५ बोगी पश्चिम रेल्वेच्या मुंबई येथे मुख्यलयाला पाठवण्यात आल्या आहेत. लवकरच यूपी, महाराष्ट्रातील रेल्वेला एसी इकोनॉमी बोगी जोडल्या जातील.
3 / 10
या एसी बोगीचा वापर केल्यानं वेटिंग लिस्टवर असणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म जागा मिळणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेच्या कमी खर्चामुळे रेल्वे प्रवासी दरातही कपात होण्याची शक्यता आहे.
4 / 10
देशात आता लिंक हॉफमैन बुश तंत्रज्ञानाच्या बोगीत थर्ड एसीच्या कोचमध्ये ७२ तर जुन्या कन्वेंशनल बोगीत ६४ जागा होत्या. आरडीएसओच्या एलएचबीने ८३ जागा असणाऱ्या बोगीचं डिझाईन बनवलं होतं. रेल्वे कोच फॅक्टरीने केवळ ३ महिन्यात १० फेब्रुवारीला त्याचा आराखडा तयार केला होता.
5 / 10
आरडीएसओने दक्षिण रेल्वे आणि राजस्थानच्या कोटा रेल्वे विभागात १८० किमी प्रतितास वेगाने मार्चमध्ये या बोगीची चाचणी करण्यात आली होती. चाचणीत यशस्वी झाल्यानंतर या बोगी दिल्लीला पाठवण्यात आल्या. जिथे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी त्याचे निरीक्षण केले.
6 / 10
आयुक्तांच्या सर्व परवानग्यानंतर फॅक्टरीने एसी इकोनॉमी बोगीचं पहिल्या टप्प्यातील उत्पादन सुरू केले. सोमवारी कोच फॅक्टरीमधून जीएम रविंद्र गुप्ता आणि मुख्य सचिव आरके मंगला यांनी थ्री टियर एसी इकोनॉमी श्रेणीच्या १५ डबे रवाना केलेत.
7 / 10
आता हे डबे रेल्वेच्या विविध मेल आणि एक्सप्रेसला जोडण्यात येतील. प्रत्येक बोगीत दिव्यांग लोकांसाठी सहजपणे उघडण्यात येतील असे शौचालयाचे दरवाजे तयार करण्यात आले आहेत. डिझाईनमध्ये प्रवाशांच्या सुविधेला ध्यानात ठेऊन अनेक सुधारणा करण्यात आल्यात.
8 / 10
ज्यात दोन्ही बाजूच्या सीटांवर फोल्डिंग टेबल आणि बॉटल होल्डर, मोबाईल तसेच मॅग्जिन हॉल्डर्स ठेवण्यात आलं आहे. इतकचं नाही तर प्रत्येक सीटवर वाचन करण्यासाठी रिडिंग लाईट आणि मोबाईल चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
9 / 10
मधल्या आणि वरच्या सीटवर चढण्यासाठी आलेल्या सीडीच्या डिझाईनमध्येही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या सीडी आकर्षिक ठरतील आणि प्रवाशांना वरच्या सीटवर जाण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही. जगातील सर्वात स्वस्त आणि सुविधायुक्त प्रवास यासाठी एसी इकोनॉमी श्रेणी बोगीचं अनावरण करणं हा रेल्वेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण असल्याचं जीएम रविंद गुप्ता म्हणाले.
10 / 10
५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत एसी बोगीचं उत्पादन करावं लागलं. लॉकडाऊनमुळे साहित्यांची जुळवाजुळव आणि कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. तरीही रेल्वे प्रशासनाने कामाबद्दल निष्ठा बाळगत मे महिन्यात १०० पेक्षा अधिक बोगीचं उत्पादन केलं आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे