शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुवर्णमंदिरासोबतच ही ठिकाणं वाढवतात ऐतिहासिक अमृतसर शहराची शान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 6:30 PM

1 / 6
शीख धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ असलेले सुवर्ण मंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या अमृतसर शहराची शान आहे. मात्र सुवर्ण मंदिरासोबतच अमृतसरमधील इतर अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत.
2 / 6
वाघा बॉर्डर - भारतातील अमृतसर आणि पाकिस्तानमधील लाहोर या दोन शहरांना जोडणाऱ्या ग्रँड ट्रंक रोड मार्गावर वाघा हे गाव येथे भारत आणि पाकिस्तानमधल दळणवळत या ठिकाणाहूनच होत असते. तसेच दर संध्याकाळी होणारे बिटिंग रिट्रीट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
3 / 6
दुर्गियाना मंदिर - या मंदिराला शितला माता मंदिर असेही मंदिर म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम 16 व्या शतकात झाले होते. त्यानंतर 20 व्या शतकात त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले.
4 / 6
जलियानवाला बाग - जलियानवाला बाग हे ठिकाण ब्रिटिशांच्या अत्याचाराची क्रूर निशाणी म्हणून ओळखले जाते. सुवर्ण मंदिरापासून जवळच असलेल्या या ठिकाणी एक स्मारक बनवण्यात आले आहे.
5 / 6
तरण तारण साहिब गुरुद्वारा - अमृतसरपासून 33 किमी अंतरावर तरण तारण जिल्हा आहे. येथे गुरू अर्जुन सिंह यांनी तरण तारण सरोवर बांधले होते. तसेच या ठिकाणी गुरू अर्जुन सिंह यांचा गुरुद्वाराही आहे.
6 / 6
गोविंदगड किल्ला - अमृतसर शहराच्या मध्यभागी गोविंदगड किल्ला आहे. हा किल्ला 17 व्या शतकात महाराजा रणजित सिंह यांनी बांधला होता. तसेच गुरु गोविंद सिंह यांच्या नावावरून किल्ल्याचे नामकरण गोविंदगड ठेवण्यात आले.
टॅग्स :tourismपर्यटनIndiaभारत