Gold Price Today: Gold price continues to rise for last three days; Find out today's rates!
Gold Price Today: गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ; जाणून घ्या आजचे दर! By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 1:45 PM1 / 8गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने घसरणारे सोन्याचे दर आता वाढताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याची किंमत वाढत असून आज त्यात किरकोळ म्हणजे 10 रुपयांची वाढ झाली आहे. 2 / 8मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,080 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,080 रुपये इतका आहे. चांदीच्याही किंमतीत 10 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 67,210 रुपये मोजावे लागणार आहेत.3 / 8 गुरुवारी सोन्याच्या किंमतीत 230 रुपयांची वाढ झाली होती. त्या आधी बुधवारी सोन्याच्या किंमतीत 180 रुपयांची वाढ झाली होती. गेल्या दहा दिवसांचा विचार करता 21 जुलैला 180 रुपये, 22 जुलैला 220 रुपये, 23 जुलैला 30 रुपयांची घसरण झाल्यानंतर पुढचे तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिले. त्यानंतर 27 जुलैला पुन्हा त्यामध्ये 210 रुपयांची घट झाली होती. 4 / 8 गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.5 / 8 आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. 6 / 8 गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याची किंमत आवाक्यात असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 7 / 8 विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 8 / 8 लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications