Gold-Silver Rate: Gold and silver prices continue to fluctuate; Find out today's rates
Gold- Silver Rate: सोनं अन् चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ -उतार सुरू; जाणून घ्या आजचे दर By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 4:50 PM1 / 5गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. 2 / 5गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनूसार, आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ४८४४० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ५३२४० रुपये इतके आहेत. 3 / 5 चांदीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाले आहे. आज चांदीचा दर प्रति किलो ६५ हजार ५०० रुपये एवढा आहे.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. आणखी वाचा Subscribe to Notifications