Gold-Silver Rate: Gold at Rs 51,110; The price of silver reached Rs 57,000
Gold-Silver Rate: सोन्याचा दर ५१,११० रुपयांवर; चांदीची किंमत पोहचली ५७ हजारांवर, जाणून घ्या, आजचा भाव By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 5:22 PM1 / 5गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे.2 / 5गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,११० रूपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४६,८५० रुपये इतके आहे.3 / 5तर १ किलो चांदीचा दर ५७,००० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. आणखी वाचा Subscribe to Notifications