शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold- Silver Rates: भारतात सतत बदलतोय सोने-चांदीचा भाव; आजचा दर किती?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 2:34 PM

1 / 5
भारतीयांचा सोने खरेदीसाठी पहिल्यापासूनच ओढा राहिलेला आहे. सोन्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हव्या त्या रकमेचे सोने आपण घेऊ शकतो. अगदी १ हजारापासून ते १ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे सोने आपण खरेदी करू शकतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत बदलत आहेत.
2 / 5
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,७५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती.
3 / 5
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६८,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी