Good news! 78 special trains to run before Navratri; See full list
खूशखबर! नवरात्रीच्या आधी 78 विशेष ट्रेन धावणार; पाहा संपूर्ण लिस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 2:46 PM1 / 10सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी 78 विशेष ट्रेन सुरु करण्यास रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी रेल्वेकडून वेगवेगळ्या झोनमध्ये सुविधेनुसार ट्रेन चालविण्यात येणार आहेत.2 / 10नवरात्र उत्सवापूर्वी सुरु करण्यात येणाऱ्या बहुतांश ट्रेन या एसी स्पेशल, राजधानी, शताब्दी आणि दुरंतो या श्रेणीमधील असतील. 3 / 10नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भारतातील पहिली खाजगी ट्रेन तेजस सुरू होणार आहे. यामध्ये पहिली तेजस ट्रेन दिल्ली ते लखनऊ आणि दुसरी अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणार आहे.4 / 10कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेजस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सेतु अॅपशिवाय प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.5 / 10रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, देशात आता सुरु होणाऱ्या या रेल्वे गाड्या विशेष ट्रेन म्हणून चालविण्यात येणार आहेत. मात्र. या ट्रेन कधी रुळावर धावणार, याबाबत काही सांगण्यात आले नाही. लवकरच सोयीस्कर तारखेपासून त्या सुरू केल्या जातील, असे रेल्वेने म्हटले आहे.6 / 10प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे बोर्डाने अन्य विशेष ट्रेन सुरु करण्यास परवानगी दिली आहे. प्रवासी संख्या जास्त आहे, अशाच ट्रेन संबंधीत मार्गांसाठी निवडल्या आहेत. झोन स्तरावर ट्रेन सुरू होण्याची तारीख जाहीर केली जाईल. मात्र, तेजस ट्रेन 17 ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या सुरुवातीला सुरु होणार आहे.7 / 10कोरोनामुळे उत्तराखंड आणि महाराष्ट्रात विविध निर्बंधांमुळे या राज्यांसाठी रेल्वेगाड्यांची संख्या फारच मर्यादित होती. या विशेष ट्रेनच्या फेरीत हरिद्वार आणि देहरादून ते मुंबई दरम्यानच्या ट्रेन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.8 / 10अलीकडेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव म्हणाले होते की, कोरोना महामारीच्या दृष्टीने केवळ राज्यांच्या संमतीनेच ट्रेनची संख्या वाढवता येऊ शकते. मात्र, आता पूर्णपणे अनलॉक केल्यावर ट्रेनची संख्या वाढू शकते. माता वैष्णो देवीसाठीही ट्रेन सुरू केली जाणार आहे.9 / 10सुरु होणाऱ्या ट्रेनची लिस्ट 10 / 10एअर कंडिशन ट्रेनची लिस्ट आणखी वाचा Subscribe to Notifications