शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर! गेल्या 15 वर्षांत 41.5 कोटी भारतीय गरीबीच्या जोखडातून बाहेर पडले, एवढेच राहिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 7:05 PM

1 / 8
गरीबी हटावचा नारा भारतात सफल होताना दिसत आहे. यामागे कोणताही पक्ष असो परंतू, गेल्या १५ वर्षांत 41.5 कोटी भारतीय गरीबीच्या जोखडातून बाहेर आले आहेत. 2005 से 2021 च्या कालावधीतील ही आकडेवारी सुखावणारी आहे. जागतीक एमपीआय व्हॅल्यूजच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. भारतासोबत चीन, कंबोडिया, कांगोसारख्या २५ देशांनाही यात यश आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
2 / 8
यूएनडीपीनुसार २००० ते २०२२ या काळात ८१ देशांच्या गरीब लोकसंख्येच्या उतार-चढावावर अभ्यास करण्यात आला. ग्लोबल MPI गरिबी कमी करणे तसेच लोक त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध पैलूंमध्ये गरीबीचा कसा अनुभव घेतात याचे मोजमाप करते.
3 / 8
शिक्षण आणि आरोग्याच्या प्रवेशापासून ते राहणीमान, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि वीज यासारख्या सर्व गोष्टींचा मागोवा घेते. भारतातील गरिबी 2005-2006 मधील 55% (64.5 कोटी) वरून 2019-2021 मध्ये 16% (23 कोटी) पर्यंत खाली आली आहे.
4 / 8
पोषण दारिद्र्य 2005-06 मधील 44% वरून 2019/21 मध्ये 12% पर्यंत खाली आले आहे, तर बालमृत्यू दर 4% वरून 1.5% वर आला आहे. गरीब आणि LPG सारख्या स्वयंपाकाच्या इंधनापासून वंचित असलेल्या लोकांची लोकसंख्या 53% वरून 14% वर आली आहे. त्याच वेळी, स्वच्छतेपासून वंचित असलेले लोक 50% वरून 11.3% पर्यंत खाली आले आहेत.
5 / 8
शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसलेली लोकसंख्या 16% वरून 3% पर्यंत घसरली, विजेचा अभाव 29% वरून 2% आणि घरांची कमतरता 44% वरून 14% वर आली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
6 / 8
भारताने सर्व निर्देशकांमध्ये गरिबी कमी करण्यात यश मिळवले आहे. ज्यात मुले आणि वंचित जाती गटातील लोकांचा समावेश आहे अशा गरीब राज्ये आणि गटांमध्ये सर्वात जलद प्रगती झाली आह, असे अहवालात म्हटले आहे.
7 / 8
110 देशांतील 6.1 अब्ज लोकांपैकी 1.1 अब्ज (18% पेक्षा थोडे जास्त) काही प्रमाणात तीव्र गरिबीत राहतात. उप-सहारा आफ्रिका (53.4 कोटी) आणि दक्षिण आशिया (38.9 कोटी) या भागात सहा लोकांमागे पाच लोक गरीब आहेत.
8 / 8
या गरीब लोकसंख्येपैकी अर्धी (566 दशलक्ष) 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आहेत. यांना शिक्षण आणि पोषण मिळाले तर लवकरच ते देखील गरीबीच्या रेषेला पार करतील असा विश्वास ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्यक्त केला आहे.
टॅग्स :Indiaभारत