Gorakhnath Temple Attack | Murtaza Ahmad Abbasi used to watch terrorist attack and ISIS video
Gorakhnath Temple Attack: दहशतवादी हल्ल्यांचे व्हिडिओ पाहून 'ब्रेन वॉश', ATSच्या चौकशीत मुर्तझा अब्बासीने केले अनेक धक्कादायक खुलासे By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 4:07 PM1 / 9 गोरखपूर: गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरात जवानांवर हल्ला करणारा आरोपी मुर्तझा अहमद अब्बासी याची लखनऊमध्ये तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात यंत्रणांसमोर मुर्तझाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुर्तझा हा मानसिक आजारी नसून तो अतिशय चलाख असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. 2 / 9 मुर्तजा अतिशय चलाख असल्याचे एटीएस अधिकाऱ्यांचे मत आहे. IITमधून केमिकल इंजिनीअरिंग केल्यानंतर त्याचे इस्लामबद्दल ब्रेनवॉश करण्यात आले. आतापर्यंतच्या तपासात त्याने सुरक्षा यंत्रणांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने 28 डॉलर्सला (2113 रुपये) एक विदेशी सिमकार्डही विकत घेतले आणि याच नंबरच्या माध्यमातून तो इसिससारख्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता.3 / 9 हल्ल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथक (ATS) हल्लेखोर मुर्तझाच्या मदतनीसांचा शोध घेत आहे. याप्रकरणी एटीएसने अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्तझा काही महिन्यांपूर्वी देवबंदला गेला होता. तेथून एटीएसने दोघांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय सहारनपूर, कानपूर, लखनऊ आणि इतर शहरातील काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.4 / 9 यासोबतच मुर्तजाचे चार बँक डिटेल्सही तपास यंत्रणांनी शोधले आहेत. आयसीआयसीआय बँक, प्लॅटिनम फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, आयसीआयसीआय बँकेच्या आणखी एका खात्याशिवाय आणखी काही खाती प्राप्त झाली आहेत. या खात्यांमधून पैसे ट्रान्सफर झाल्याचा संशय आहे. एटीएस मुर्तझाला स्लीपर सेलचा एक भाग मानत आहे.5 / 9 एडीजी अखिल कुमार यांनी आज तकशी संवाद साधताना सांगितले की, मुर्तझा अत्यंत धोकादायक प्लॅनिंगसह गोरखनाथ मंदिरात पोहोचला होता. तो त्याच्या कटात यशस्वी झाला असता तर मोठी घटना घडली असती. मुर्तजाकडे धारदार शस्त्र होते, जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला असता तर त्याचा फटका सर्वसामान्यांनाही बसला असता. 6 / 9 अखिल कुमार पुढे म्हणाले की, आम्ही सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहोत. गोरखनाथ मंदिराच्या गेटवरच बुलेट प्रूफ पोस्ट लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सैनिकांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेतून आपण खूप काही शिकलो असा विश्वास अखिल कुमारने व्यक्त केला आहे. 7 / 9 मुर्तझा अब्बासी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. ट्विटरवर तो सीरिया कॅम्पमध्ये विस्थापित निर्वासित मुस्लिमांच्या मदतीसाठी तयार केलेल्या खात्याला फॉलो करत असे. रात्रभर चौकशीदरम्यान मुर्तुजा अब्बासीच्या गुरूचे नावही तपास पथकाला समोर आले आहे. मुर्तझा अब्बासी येमेन अमेरिकन इमाम अन्वर अल-हलाकी याला आपला गुरू मानत असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे.8 / 9 याशिवाय तो सीरियातील शिरच्छेद, अमेरिकेतील 9/11 हल्ला आणि पाश्चात्य देशांतील दहशतवाद्यांनी केलेल्या लोन वुल्फ हल्ल्यांचे व्हिडिओ पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओ आणि भडकाऊ भाषणांमुळे मुर्तझाचे ब्रेनवॉश झाले होते आणि तो मोठी घटना घडवण्याच्या तयारीत होता, असे तपास यंत्रणांचे मत आहे.9 / 9 आता मुर्तजाची चौकशी करण्यासाठी गुजरात एटीएसचे पथकही लखनौला पोहोचले आहे. अब्बासी याच्याकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये जामनगरचे कनेक्शन समोर आले आहे. गुजरात कनेक्शनबाबत चौकशीसाठी गुजरात एटीएस यूपीत येत आहेत. यूपी एटीएसला अहमद मुर्तझा अब्बासीकडून अनेक बँकांचे एटीएम देखील मिळाले आहेत, ज्यांचे व्यवहार यूपी एटीएस शोधत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications