शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस?; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 4:17 PM

1 / 10
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १ कोटीच्या पुढे गेला आहे. काल दिवसभरात देशात २० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले.
2 / 10
गेल्या काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र तरीही कोरोना लसीकरण वेगानं सुरू होणं गरजेचं आहे.
3 / 10
लवकरच केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणास मंजुरी मिळू शकते. त्यामुळे सरकारनं लसीकरणाची रंगीत तालीम सुरू केली आहे.
4 / 10
आज गुजरात, आसाम, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली. या ड्राय रनमध्ये येणाऱ्या अडथळे, त्रुटींनुसार लसीकरण प्रक्रियेत सुधारणा करण्यात येतील.
5 / 10
सर्वात आधी कोरोना लसींचे डोज राज्यांमध्ये पाठवण्यात येतील. तिथून ते जिल्हा, शहर, गावांमध्ये पाठवले जातील.
6 / 10
कोरोना लसीच्या भंडारातून लसी पाठवल्या जात असताना त्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. त्यांचं तापमान वारंवार तपासून पाहण्यात येईल.
7 / 10
सध्याच्या घडीला तीन लसी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र त्यांची साठवणूक करण्याचं तापमान वेगवेगळं आहे. त्यामुळे तापमान योग्य राहील याची काळजी घेतली जाईल.
8 / 10
लसीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असताना लस ज्यांना दिली जाणार आहे, त्यांना एसएमएस पाठवण्यात येईल.
9 / 10
लस टोचली जाणार असलेल्या व्यक्तीला लसीकरणाच्या पथकाची, वेळ आणि ठिकाणाची माहिती एसएमएसमधून दिली जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीनं देण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन लस टोचून घ्यायची आहे.
10 / 10
सुरुवातीच्या टप्प्यात देशातील ३० कोटी लोकांना लस दिली जाणार असून त्यात आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, इतर कोरोना योद्धे आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असेल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या