शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar: आधार व्हेरिफिकेशनसाठी सरकारनं बनवला नवा नियम, जाणून घ्या नाहीतर होईल मोठी अडचण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 3:19 PM

1 / 8
आधार कार्ड हे भारतातील अनिवार्य आणि महत्वाचं ओळखपत्र आहे. त्याशिवाय देशात कोणतेही काम होऊ शकत नाही. UIDAI सुद्धा आधारशी संबंधित माहिती वेळोवेळी देत असतं. सरकारनं आधार पडताळणीबाबत (Aadhaar Verification) नवा नियम केला आहे.
2 / 8
नियमानुसार, तुम्ही तुमचा आधार ऑफलाइन किंवा कोणत्याही इंटरनेटशिवाय व्हेरिफिकेशन करु शकणार आहात. आता तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रं देता येणार आहेत. हे डिजिटल स्वाक्षरी केलेले कागदपत्रं आधारची सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केलेले असावेत.
3 / 8
विशेष म्हणजे, सरकारनं आधार (प्रमाणीकरण आणि ऑफलाइन पडताळणी) नियमावली, 2021 (नियम) 8 नोव्हेंबर 2021 रोजी अधिसूचित केलं आणि 9 नोव्हेंबर 2021 रोजी अधिकृत वेबसाइटवर जारी केली होती. यामध्ये ई-केवायसी (e-kyc) साठी आधारच्या ऑफलाइन पडताळणीची तपशीलवार प्रक्रिया सांगण्यात आली आहे.
4 / 8
येथे KYC म्हणजे 'ग्राहकाची माहिती' जे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल. त्यामुळे त्याचं नाव ई-केवायसी असं देण्यात आलं आहे.
5 / 8
या नवीन नियमात, आधार धारकाला एक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आधार ई-केवायसी व्हेरिफिकेशनसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला आपला आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी देता येऊ शकेल. यानंतर एजन्सी आधार धारकानं दिलेला आधार क्रमांक आणि नाव, पत्ता इत्यादी केंद्रीय डेटाबेसशी जुळवेल. जुळणी बरोबर असल्याचं आढळल्यास पडताळणीची प्रक्रिया पुढे नेली जाईल.
6 / 8
आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी म्हणजे डिजिटल स्वाक्षरी असलेला दस्तऐवज जो UIDAI द्वारे जारी केला जातो. यात आधार क्रमांकाची शेवटची ४ अक्षरं, नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो यांची माहिती आहे. सरकारनं जारी केलेला हा नवीन नियम आधार धारकांना व्हेरिफिकेशन एजन्सीला त्यांचा कोणताही ई-केवायसी डेटा संग्रहित केला जाऊ नये असं सांगण्याचा अधिकार देतो.
7 / 8
नियमांनुसार, UIDAI पुढील प्रकारच्या ऑफलाइन पडताळणी सेवा प्रदान करतं. QR कोड पडताळणी, आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी पडताळणी, ई-आधार पडताळणी, ऑफलाइन पेपर आधारित पडताळणी.
8 / 8
ऑनलाइन आधार पडताळणीसाठी धारकांकडे इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाइन पर्यायांसह उपलब्ध असलेल्या आधार पडताळणीच्या विविध पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन, वन-टाइम पिन आधारित प्रमाणीकरण, बायोमॅक्ट्रिक ऑथेंटिकेशन, मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डCentral Governmentकेंद्र सरकार