Gratuity of lakhs of rupees after working in the same company for 5 consecutive years; Know About
सलग ५ वर्ष एकाच कंपनीत काम केल्यावर मिळते लाखो रुपये Gratuity; जाणून घ्या गणित By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 4:20 PM1 / 8खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते. मात्र ग्रॅच्युइटीशी संबंधित अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात कायम असतात. साधारणपणे असे मानले जाते की एखाद्या कंपनीत सतत पाच वर्षे काम केल्यावरच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचे फायदे मिळतात. 2 / 8सरकारने नवीन लेबर कोडमध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले होते. मात्र, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सतत सेवेसाठी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. 3 / 8प्रश्न- ग्रॅच्युइटी म्हणजे काय? (What is Gratuity) उत्तर- कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी दिली जाते. एक प्रकारे, सलग सेवेच्या बदल्यात, कंपनीकडून कर्मचार्याचे आभार मानले जातात.4 / 8पेमेंट आणि ग्रॅच्युइटी कायदा देशातील सर्व कारखाने, खाणी, तेल क्षेत्र, बंदरे आणि रेल्वे यांना लागू होतो. यासोबतच १० पेक्षा जास्त कर्मचारी काम करणाऱ्या दुकाने आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.5 / 8कोणत्याही कंपनीत ५ वर्षे सतत काम करणारे कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. परंतु काही प्रकरणांमध्ये, ग्रॅच्युइटीचा लाभ 5 वर्षांपेक्षा कमी सेवेसाठी देखील उपलब्ध आहे. ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2A मध्ये सतत काम करणे ही स्पष्टपणे व्याख्या करण्यात आली आहे. 6 / 8यानुसार अनेक कर्मचाऱ्यांना पूर्ण ५ वर्षे काम न करूनही ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकतो. ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2A नुसार, जर भूमिगत खाणींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मालकासह सतत ४ वर्षे १९० दिवस पूर्ण केले, तर त्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. 7 / 8तर, इतर संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी ४ वर्षे २४० दिवस (म्हणजे ४ वर्षे ८ महिने) काम केल्यानंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र होतात. नोटिस कालावधी ग्रॅच्युइटी वेळेच्या गणनेत गणला जातो की नाही याबद्दल अनेक लोक गोंधळलेले आहेत?पण नोटीस कालावधी 'सतत सेवा' मध्ये गणला जातो8 / 8एकूण ग्रॅच्युइटी रक्कम = (अंतिम पगार) x (15/26) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या). उदाहरणासह समजून घ्या - समजा तुम्ही एकाच कंपनीत सलग ७ वर्षे काम केले. अंतिम वेतन ३५००० रुपये आहे (मूळ वेतन आणि महागाई भत्त्यासह). तर असा कॅलक्युलेट करा (35000) x (15/26) x (7) = १,४१,३४६ रुपये. एका कर्मचाऱ्याला कमाल २० लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटी मिळू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications