शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नात कोरोनाचा संसर्ग, वधूसह ९ जण पॉझिटिव्ह, वराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 5:14 PM

1 / 8
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून एका कुटुंबातील नऊ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. संक्रमित लोकांमध्ये वधूचा देखील समावेश आहे.
2 / 8
कोरोना संक्रमित लोकांवर उपचार केले जात आहेत. 10 दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर 4 डिसेंबरला वराचा मृत्यू झाला.
3 / 8
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, वराला ताप आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. मात्र, त्याची कोरोना टेस्ट झाली नव्हती. यानंतर संशयावरून जेव्हा कुटुंबीयांची कोरोना तपासणी केली गेली, तेव्हा नऊ लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले.
4 / 8
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, या तरुणाचे 25 नोव्हेंबरला लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच या तरूणाची तब्येत ढासळली आणि 4 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला.त्यानंतर कोरोना चाचणीत वधूसह 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.
5 / 8
यात वधूच्या सासूचा देखील समावेश आहे. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. याशिवाय, गावातील इतर लोकांच्या कोरोनाची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय शिबीरही लावण्यात आले आहे.
6 / 8
डॉ. नीता म्हणाल्या की, आरोग्य विभागातर्फे गावात कोरोना चाचणी कॅम्प लावण्यात आले आहे. जेणेकरून संपर्कात येणाऱ्या लोकांना ओळखून त्यांची तपासणी करता येईल.
7 / 8
डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी अशी माहिती दिली की, जिल्ह्यात आतापर्यंत 3673 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 67 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
8 / 8
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा रुग्णांच्या संख्येत घट होत असून बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. तसेच, लवकरच कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न