गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रुपाणी कायम By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 8:40 PM
1 / 5 अहमदाबाद : गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे. 2 / 5 गुजरातमध्ये काठावरचं बहुमत मिळवून सत्ता राखण्यात यशस्वी ठरल्यानंतर भाजपा राज्यात नेतृत्वबदल करेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. 3 / 5 याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान, २५ डिसेंबर रोजी विजय रुपाणी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी शक्यता आहे. 4 / 5 नितीन पटेल यांनाही उपमुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यावर एकमत झाले. विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 5 / 5 गुजरातमध्ये भाजपाने सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली आहे. पण या निवडणुकीत भाजपाचे मताधिक्क्य आणि जागा ब-यापैकी घटल्या आहेत. 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवणा-या भाजपाला फक्त 99 जागांवर समाधान मानावे लागले. आणखी वाचा