Gujarat : kandla port mt ganesh fire diesel tank
गुजरात : कांडला बंदराजवळ तेलाने भरलेल्या जहाजाला आग, दोन जण जखमी By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 2:34 PM1 / 6गुजरात किनारपट्टीनजीक बुधवारी (17 जानेवारी) मर्चंट नेव्हीच्या एका तेलवाहक जहाजाला आग लागली.2 / 6 या जहाजात तब्बल 30 हजार टन हाय-स्पीड डिझेल असल्याचे सांगण्यात येते आहे.3 / 6'एएनआय'च्या वृत्तानुसार जहाजाच्या परिसरातील पाण्याच्या नमुन्यांमध्ये मात्र तेल आढळून आलेले नाही.4 / 6बुधवारी (17 जानेवारी) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या जहाजाला आग लागल्याची माहिती समोर आली.5 / 6 भारतीय तटरक्षक दलाने तत्परता दाखवत जहाजाच्या चालकासह सर्व 26 क्रू मेंबर्सना वाचवले. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.6 / 6आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications