Gujarat Morbi Machchu Dam Failure 1979 | Morbi Bridge Collapse 2022 News
तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 6:02 PM1 / 9 मोरबी: गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीवरील झुलता पूल रविवारी कोसळला. त्यावरील सुमारे 500 लोक नदीत पडले. सरकारी आकडेवारीनुसार या अपघातात 134 लोकांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. 2 / 9 या भीषण अपघाताने मोरबीतील जनतेला 43 वर्षांपूर्वीच्या वेदनादायक घटनेची आठवण करून दिली. मच्छू नदीचे धरण फुटल्याने ही दुर्घटना घडली होती. 11 ऑगस्ट 1979 रोजी घडलेल्या घटनेने संपूर्ण शहराचे स्मशानभूमीत रूपांतर झाले होते.3 / 9 धरण ओव्हरफ्लो झाले अन्...भास्करच्या वृत्तानुसार, 43 वर्षांपूर्वी संततधार पाऊस आणि स्थानिक नद्यांना पूर आल्याने मच्छू धरण ओव्हरफ्लो झाले होते. 4 / 9 काही वेळातच संपूर्ण शहरात नासधूस झाली. 11 ऑगस्ट 1979 रोजी दुपारी 3.15 वाजता धरण फुटले आणि अवघ्या 15 मिनिटांत धरणाच्या पाण्याने संपूर्ण शहर व्यापले. घरे आणि इमारती क्षणार्धात कोसळल्या, लोकांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही.5 / 9 1400 लोकांचा मृत्यू झाला- सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत 1439 लोक आणि 12,849 हजारांहून अधिक जनावरे मरण पावली होती. पुराचे पाणी ओसरल्यानंतर शहरातील भयानक दृश्य पाहायला मिळाले. खांबांवर माणसांपासून जनावरांचे मृतदेह लटकत होते. या दुर्घटनेत संपूर्ण शहर ढिगार्यात बदलले होते.6 / 9 शहरात सर्वत्र फक्त आणि फक्त मृतदेहच दिसत होते. या भीषण अपघातानंतर इंदिरा गांधी जेव्हा मोरबीला गेल्या तेव्हा मृतदेहांचा वास इतका आला की त्यांना नाकाला रुमाल बांधावा लागला होता. 7 / 9 माणसांचे आणि प्राण्यांचे मृतदेह कुजले होते. त्यावेळी मोरबीला भेट देणारे नेते आणि बचाव कार्यात सहभागी असलेले लोकही आजारी पडले होते. 8 / 9मोदींचा इंदिरा गांधींवर निशाणा- पाच वर्षांपूर्वी मोरबी येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते - 'मच्छू धरण दुर्घटनेनंतर मदतकार्य सुरू असताना राहुल गांधींच्या आजी इंदिराबेन रुमाल बांधून दुर्गंधी आणि घाण टाळत होत्या.'9 / 9 'पण, संघाचे कार्यकर्ते चिखलात आणि घाणीत सेवा देत होते. तेव्हा चित्रलेखा या गुजराती मासिकाने इंदिरा गांधी आणि संघ कार्यकर्त्यांचा फोटो छापला होता. या पूल दुर्घटनेने मोरबीच्या नागरिकांच्या मनात त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications