शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युनेस्कोच्या यादीत गुजरातचे 'ढोलवीरा', मोदींकडून आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 9:56 PM

1 / 10
युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज लिस्टमध्ये भारतातील आणखी दोन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचा समावेश झाला आहे.
2 / 10
सरकारने 2019 च्या युनेस्कोच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी तेलंगणातील रामप्पा मंदिराचे नामांकन दिले होते. युनेस्कोच्या वर्ल्डे हिरेटेज लीस्ट समितीच्या 44 व्या सत्रातील बैठकीत 25 जुलै रोजी रामप्पा मंदिराला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
3 / 10
त्यानंतर, आज 27 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीत गुजरातमधील धोलावीरा या ऐतिहासिक ठिकाणालाही स्थान देण्यात आले आहे.
4 / 10
गुजरातमधील हडप्पा कालीन संस्कृतीचे धोलावीरा आणि तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणजेच (रामप्पा मंदिर) या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेड लिस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे.
5 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बातमीनंतर देशावीसीयांचे अभिनंदन करत, स्वत:लाही अत्यानंद झाल्याचे म्हटले आहे. गुजरातमधील धोलावीरा हे ठिकाण मोदींच्या जुन्या आठवणींचं माहेर आहे.
6 / 10
मोदींनी धोलावीरा येथील भेटीचे फोटो शेअर करत काही जुन्या आठवणी जागवल्या आहेत. मी विद्यार्थी असल्यापासून धोलावीरा येथे जात असून मुख्यमंत्री असतानाही भेट दिल्याचे मोदींनी म्हटले.
7 / 10
युनेस्कोच्या यादीत आता देशातील 40 ऐतिहासिक वास्तूंचा समावेश झाला आहे. त्यामध्ये 32 वास्तू सांस्कृतिक असून 7 नैसर्गिक ठिकाणं आहेत. तर, 1 संमिश्र असे स्थळ आहे.
8 / 10
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनीही भारतातील आणखी दोन वास्तूंचा या यादीत समावेश झाल्याबद्दल भारतीयांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुंढेंनी या वास्तूंचे फोटोही शेअर केले आहेत.
9 / 10
युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज यादीत महाराष्ट्रातील 4 ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये, अजेंठा आणि वेरुळच्या लेण्या, एलिफंटा लेणी व मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजा टर्मिनल्स या 4 ऐतिहासिक वास्तूंना स्थान आहे.
10 / 10
युनेस्कोच्या यादीतील एकूण 40 वास्तूंमध्ये महाराष्ट्रातील 4 ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातTwitterट्विटर