Gujrat riot : During the 9-hour interrogation, narendra Modi did not even drink plain tea
गुजरात दंगल : 9 तासांच्या चौकशीत मोदींनी साधा चहासुद्धा घेतला नाही By महेश गलांडे | Published: October 28, 2020 3:35 PM1 / 14गुजरात 2002 च्या दंगल प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एसआयटी पथकाने तब्ब्ल 9 तास चौकशी केली होती.2 / 14याप्रकरणी नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख आर. के. राघवन यांच्या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले, त्यामध्ये माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार, या 9 तासांच्या चौकशीत मोदींनी एक कपभरही चहा घेतला नाही.3 / 14गुजरात दंगल प्रकरणावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते, त्यांना गांधीनगर येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.4 / 14मोदींनी चौकशीला हजर राहताना आपल्यासोबत एक पाण्याची बाटली आणली होती. 5 / 14या 9 तासांच्या चौकाशीत मोदींनी ना चहा घेतला, ना नाश्ता. केवळ पाणी घेतले.6 / 14राघवन यांच्या 'अ रोड वेल ट्रॅव्हल्स' या पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे.7 / 14सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरात दंगल प्रकरणी एसआयटी पथकाची नेमणूक करण्यात आली होती8 / 14या पथकाचे नेतृत्व राघवन यांच्याकडे होते, त्यांनी सीबीआयचे संचालक असताना बोफार्स घोटाळा, चारा घोटाळा, भारत vs द. आफ्रिका सामन्यात फिक्सिंग प्रकरणी चौकशी केली होती.9 / 14मुख्यमंत्री असल्याने मोदींना कार्यालयात बोलवायचे कसे हा प्रश्न होता, पण एका अधिकाऱ्यामार्फत विचारणा केली, त्यावर मोदींनी तत्काळ होकार दिला.10 / 14याप्रकरणी चौकशीची जबाबदारी मी पथकातील सहकारी अशोक मल्होत्रा यांच्याकडे दिली होती. 11 / 14मी स्वतः चौकशी केली असती तर, प्रश्नचिन्ह आणि संशय निर्माण झाला असता, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचे राघवन यांनी म्हटलं.12 / 14मोदींना 9 तासांच्या चौकशीत 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर टाळले नाही, शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे मोदींनी दिल्याचे राघवन यांनी लिहिले आहे.13 / 14मोदींना विश्रांतीसाठीही विचारण्यात आलं होतं, पण त्यांनी नकार दिला. शेवटी मल्होत्रा यांना विश्रांती हवी असल्याने मोदींनीही काही मिनिटांसाठी विश्रांती घेतली.14 / 14याप्रकरणी मोदींसह 63 जणांना एसआयटीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications