शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gyanvapi Exclusive Photo: ज्ञानवापी मशिदीचे न पाहिलेले फोटो आले; नंदी, कथित शिवलिंग, स्वस्तिक आणि 4 तळघरे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:10 PM

1 / 13
ज्ञानव्यापी मशीदीचा रिपोर्ट कोर्टात आज सादर केला जाणार आहे. ही मशीद होती की मंदिर याचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. बाहेरील बांधकाम हे मंदिराचे दिसत असले तरी आतील भाग मशीदीचा बनविण्यात आला आहे. या मशीदीचे आतील फोटो समोर आले आहेत.
2 / 13
मशीदीच्या आतमध्ये जेव्हा पहिल्यांदाच कॅमेरा गेला तेव्हा पांढऱ्या चुन्याने रंगविलेल्या पायऱ्यांवरून कोर्ट कमिशनर अशा जागी पोहोचल्या की तिथे घुमटाखाली घुमट होता.
3 / 13
मशीदीच्या तीन मुख्य घुमटांच्या बाजुने एक छोटा दरवाजा होता. त्यातून आतमध्ये शिरल्यावर घुमटाखाली आणखी एक घुमट दिसला. ते घुमट कोणाचे आहेत? एकावर एक का बनविण्यात आले? लपविण्यात आलाय का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
4 / 13
घुमटाच्या खाली सापडलेल्या घुमटाच्या मध्यभागी काही खुणांची नोंद घेण्यात आली आहे. घुमटाच्या मध्यभागी खोल खुणा कशाच्या आहेत? त्या काहीतरी काढून टाकल्यामुळे झाल्या आहेत का?
5 / 13
ज्ञानवापी मशिदीखाली 4 तळघरे असल्याचा दावा करण्यात आला आहे. जेव्हा या 4 तळघरांचे दरवाजे उघडले तेव्हा तिथे काय सापडले? या गोष्टी म्हणजे मोठे पुरावे असल्याचा दावा हिंदू पक्ष करत आहे.
6 / 13
मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीकडे जाताना सर्वेक्षण पथकाला सापडलेल्या दोन थडग्यांसारख्या आकृत्या कोणत्या आहेत?
7 / 13
मशिदीच्या पश्चिमेला बांधलेली भिंत आणि मशिदीची सध्याची रचना यात काय फरक आढळला?
8 / 13
दगडी कोरीव काम. भिंतीवरील दरवाजासारख्या आकाराबाबत सर्वेक्षण अहवालात काय दावा करण्यात आला आहे?
9 / 13
मंदिर आणि मशिदीच्या मधोमध उभ्या असलेल्या लोखंडी भिंतीखाली तुटलेल्या भिंतींवर भगव्या रंगात रंगवलेले दगड दिसतात, ते काय आहेत?
10 / 13
ज्ञानवापी मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमिनीवर अंथरलेल्या पट्ट्या का काढण्यात आल्या होत्या? त्याखाली काय आढळले.
11 / 13
ज्ञानवापी मशिदीच्या आतमध्ये जे सापडले त्याला हिंदू पक्ष शिवलिंग असल्याचे सांगत आहे, त्याची 7 कोनातून व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे.
12 / 13
यामध्ये एक व्हिडीओ नंदीचा देखील आहे. ज्यामध्ये नंदी मशिदीच्या वजूखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाकडे पाहत आहे. यामध्ये 83 फूट अंतर आहे.
13 / 13
मशिदीच्या भिंतींवर हिंदू चिन्हे आहेत, हाच सर्वात मोठा दावा हिंदू पक्षाचा आहे.
टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदCourtन्यायालय