असं आहे ज्ञानवापीमधील व्यास तळघर, कोर्टाच्या आदेशानंतर तब्बल तीन दशकांनी झाली पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:58 IST
1 / 6वाराणसीमधील ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात पूजा करण्याचे आदेश कोर्टाने नुकतेच दिले. त्यानंतर इथे ३० वर्षांनंतर पूजा झाली. त्याबरोबर आता व्यास तळघराचे काही फोटो समोर आले आहेत. 2 / 6जवळपास ३० वर्षांनंतर व्यास तळघरात पूजा झाली. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर प्रशासनाने काही तासांमध्येच कोर्टाच्या आदेशाचा अंमलबजावणी केली. व्यास तळघराच्या समोर आलेल्या फोटोंमधून येथील भिंतींवरील देवतांच्या प्रतिमा स्पष्टपणे दिसत आहेत. 3 / 6व्यास तळघरामध्ये काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललांच्या प्राण प्रतिष्ठापनेचा मुहुर्त काढणारे गणेश्वर द्रविड यांनी सुमारे ३० वर्षांनंतर या ठिकाणी पूजा केली. 4 / 6या तळघरातील खांब शेकडो वर्षांनंतरही सुस्थितीत दिसत आहेत. बुधवारी साफसफाई केल्यानंतर पूजा सुरू करण्यात आली. आता इथे नित्यनियमाने दररोज पूजा होईल, असे पुजारी माधव दत्त त्रिपाठी यांनी सांगितले. 5 / 6 व्यास तळघरात पूजा करता यावी यासाठी शैलेंद्र कुमार पाठक यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरामध्ये व्यास परिवार गेल्या ४०० वर्षांपासून शैव परंपरेनुसार पूजा करत होतं. मात्र डिसेंबर १९९३ नंतर पुजाऱ्यांना अडवून येथील पूजा बंद करण्यात आली होती. 6 / 6येथील पूजेला कोर्टाने परवानगी दिल्यानंतर ज्ञानवापी परिसर आणि काशी विश्वेश्वर मंदिर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ३० वर्षांनंतर मागच्या वर्षी व्यास तळघरात पूजा झाल्याल्यानंतर भाविकांनी व्यास तळघरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या.