शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

H3N2 Virus Corona : भारतात अचानक H3N2 आणि कोरोनाचे रुग्ण का वाढले? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:35 PM

1 / 8
H3N2 Virus Corona : गेल्या काही दिवसांपासून देशावर विषाणूचा दुहेरी हल्ला झाला आहे. इन्फ्लूएंझाच्या H3N2 विषाणूसोबतच कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहेत. यावेळी इन्फ्लूएंझासह कोविडमुळेही मृत्यू होत आहेत.
2 / 8
कोरोनामुळए देशभरात एका आठवड्यात 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन्ही विषाणूंच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य मंत्रालयाने सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अचानक देशात इन्फ्लूएंझा आणि कोविडची प्रकरणे का वाढू लागली आहेत? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊ...
3 / 8
तज्ज्ञ सांगतात की, इन्फ्लूएंझा हा श्वसनमार्गाने होणारा संसर्ग आहे. दरवर्षी याची प्रकरणे देशात येतात, मात्र यावेळी अधिक प्रकरणे येत आहेत. यावेळी इन्फ्लूएंझाच्या H3N2 स्ट्रेनमध्ये बदल झाला आहे, ज्यामुळे हा विषाणू झपाट्याने पसरत आहे. पण, यामुळे लोकांना घाबरण्याची गरज नाही.
4 / 8
इन्फ्लूएंझाचा धोका फक्त वृद्धांना आणि इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनाच जास्त असतो. इतर लोकांमध्ये याची लक्षणे खोकला आणि सर्दीसारखीच असतात. हा आजार काही बरा होतो. पण, या काळात स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे.
5 / 8
सध्या देशात असलेला ऋतू कोणत्याही प्रकारच्या विषाणूंसाठी अनुकूल असतो. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्णही कमी होत होते, त्यामुळे लोक गाफील राहू लागले होते. पूर्वीचे लोक कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत होते. मास्क घालायचे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे, पण आता दुर्लक्ष खूप वाढले आहे.
6 / 8
अशा परिस्थितीत इन्फ्लूएंझा आणि कोविडला वाढण्याची संधी मिळाली आहे. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत आहे. त्यामुळे या दोन्ही विषाणूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मास्क घालणे, सातत्याने हात धुणे, तोंड आणि नाकाला हात न लावणे, यांसारखे उपाय महत्वाचे आहेत.
7 / 8
कोविड आणि इन्फ्लूएंझा संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो, परंतु अशी प्रकरणे क्वचितच आढळतात. एखाद्या व्यक्तीला या दोन्ही विषाणूंची लागण झाली असेल तर त्याची प्रकृती बिघडू शकते. तीन दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, सर्दी किंवा तापाची तक्रार असल्यास डॉक्टरांना दाखवा.
8 / 8
यामुळे आजार ओळखला जाईल आणि वेळेत उपचारही होतील. ओमायक्रॉनचा XBB1.16 प्रकार, दादेखील कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे एक कारण आहे. हा प्राणघातक नाही, परंतु लोकांना वेगाने संक्रमित करू शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या