शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुख्यमंत्र्यांच्या 'कडक' निर्णयाला भज्जीचा फुल्ल सपोर्ट, नागरिकांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 11:03 AM

1 / 10
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे संकेत दिले होते.
2 / 10
त्यानुसार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात एसओपीही जारी करण्यात आली आहे.
3 / 10
राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू झाले असून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. सीएमओकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
4 / 10
देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातून येत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून वारंवार राज्यात कडक निर्बंध लादत, लॉकडाऊनचे संकेत दिले होते.
5 / 10
याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानावर रोखठोक भूमिका घेतली होती.
6 / 10
'लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा गांभीर्यानं मुद्दा समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही', असा संताप हरभजननं व्यक्त केला होता.
7 / 10
महाराष्ट्रात आता कडक निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांनी नवीन नियमावली पाळावी, असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन केले आहे.
8 / 10
आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन नवी निमयावलीही प्रसिद्ध केल असून ब्रेक द चेनची निमयावली पाळून सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केलंय.
9 / 10
आदित्य ठाकरेंचं हे ट्विट हरभजन सिंगने रिट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला फुल्ल सपोर्ट दर्शवला आहे.
10 / 10
हरभजनने आणखी एक ट्विट केलंय. त्यामध्ये, देशात दररोज 1 लाख रुग्ण आढळून येत आहेत. सर्वांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करुया, सर्वांनी सुरक्षित राहावे हीच विनंती, असे भज्जीनं म्हटलंय.
टॅग्स :Harbhajan Singhहरभजन सिंगTeam Indiaभारतीय क्रिकेट संघUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे