Harvinder Singh Rinda: Know about Pakistan based terrorist Harvinder Singh Rinda
Harvinder Singh Rinda:पाकिस्तानात बसून करतो भारताविरोधी कारवाया, कोण आहे हरविंदर सिंग रिंदा? By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 4:38 PM1 / 7 Harvinder Singh Rinda: हरियाणा पोलिसांनी एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. हरिणातील करनालमध्ये पोलिसांनी 4 संशयित दहशतवाद्यांना अटक केली, त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या चौघांचा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.2 / 7 आयबीच्या गुप्ता माहितीच्या आधारे पोलिसांनी या सर्वांना पकडले. पंजाब किंवा दिल्लीमध्ये मोठा हल्ला घडवणार होते, असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, या कटाचा खरा सूत्रधार पाकिस्तानमध्ये बसलेला हरविंदर सिंग रिंडा असल्याचे उघड झाले आहे. लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातही रिंदाचा हात आहे. 3 / 7 पोलिसांच्या नोंदीनुसार, कौटुंबिक वादातून रिंदाने वयाच्या 18व्या वर्षी तरनतारनमध्ये त्याच्या एका नातेवाईकाची हत्या केली होती. नांदेड साहिबमध्ये त्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून खंडणी सुरू केली आणि तिथेही दोन लोकांची हत्या केली. त्याच्याविरुद्ध वजिराबाद आणि विमंतल पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायदा आदी कलमांखाली दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. 4 / 7 भारतातून पळून गेलेला हरविंदर रिंदा हा A+ श्रेणीतील गँगस्टर आहे. अनेक राज्यांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड आहे. त्याच्यावर पंजाब, महाराष्ट्र, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्येही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सुमारे दहा खून, सहा खूनाचा प्रयत्न, दरोडा, यासह शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत.5 / 7 याशिवाय, रिंदाविरोधात अमली पदार्थांच्या तस्करीचेही अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पाकिस्तानमधून भारतात अमली पदार्थांची तस्करी करतो. रिंदा हा खलिस्तानी समर्थक असून, 2017 मध्ये तो पोलिसांच्या हातून निसटला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात गेल्याची माहिती मिळाली. 6 / 7 पंजाब विद्यापीठाचा विद्यार्थी असताना रिंदाने सेक्टर 11च्या एसएचओला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यापूर्वी त्याचा विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग होता. रिंदा हा पंजाबमधील तरनतारण जिल्ह्यातील रहिवासी आहे. वयाच्या 11व्या वर्षी आपल्या कुटुंबासह तो महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थलांतरित झाला.7 / 7 नवांशहर येथील सीआयए कार्यालयावर हँडग्रेनेड हल्ल्याच्या प्रकरणातही रिंदाचे नाव पुढे आले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने कबूल केले होते की, हरविंदर सिंग रिदांच्या सांगण्यावरून त्याने मनीषसह नवांशहर सीआयए कार्यालयावर हँडग्रेनेड फेकले होते, तर रमणदीप याने रिंदाच्या सांगण्यावरुन हातबॉम्ब फेकले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications