शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 11:14 PM

1 / 6
हरियाणा विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळेल, तर भाजपाचा दारुण पराभव होईल, अशी शक्यता जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.
2 / 6
दरम्यान, विविध एक्झिट पोटमधून विविध पक्षांना मिळणाऱ्या मतांचीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपाला किंचित अधिक मतं मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र भाजपाच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हरियाणात नेमका मतदानाचा पॅटर्न काय राहणार आणि काय, नंबर गेम असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
3 / 6
मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २८.८ मतांसह ३१ जागा तर भाजपाला ३६.४९ टक्के मतांसह ४० जागा मिळाल्या होत्या. मात्र इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्व्हेनुसार यावेळी भाजपाला ३७.२ टक्के मिळण्याची शक्यता आहे. मात्र भाजपाच्या जागांमध्ये तब्बल १० ते २० जागांची घट होण्याची शक्यता आहे.
4 / 6
मतं वाढूनही भाजपाच्या जागा घटण्याच्या वर्तवण्यात आलेल्या शक्यतेमागचं दिसत असलेलं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या निवडणुकीत जाट मतांचं विभाजन होऊन जेजेपीकडे त्यांच्या मतांचा मोठा वाटा गेला होता. त्यावेळी दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीने १० जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी जेजेपी, तसेच आयएनएलडी या पक्षांना फारसं मतदान न होता त्यांचा बहुतांश मतदार हा काँग्रेसकडे वळलेला दिसत आहे. तसेच आयएनएलडीचाही बहुतांश मतदार हा काँग्रेसकडे वळताना दिसला आहे.
5 / 6
यावेळी हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस यांच्यामध्ये थेट निवडणूक झालेली दिसली. त्यामुळे या थेट लढतीत अन्य कुठलाही पक्ष मतदारांना आकर्षित करू शकला नाही. तसेच एक्झिट पोलच्या निकालांमध्येही हाच आकडा दिसत आहे. मागच्या वेळी चांगली कामगिरी करणाऱ्या जेजेपीला यावेळी केवळ ३.८ टक्केच मतं मिळताना दिसत आहेत. तर आयएनएलडीचं खातंही उघडण्याची शक्यता कमी दिसत आहे.
6 / 6
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हरियाणामध्ये ४७.६१ टक्के एवढी मतं मिळाली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांच्या संख्येमध्येही जवळपास ४ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता दिसत आहे.
टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी