Hawai Adda, this Ludhiana restaurant is inside an actual airplane
लुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 3:25 PM1 / 7हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेणे प्रत्येकालाच आवडतं. अनेक हॉटेल्सही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे आजमावत असतात. असंच एक हवाईसफर घडवणारे हॉटेल लुधियानामध्ये आहे. 2 / 7लुधियानामध्ये एका खऱ्या विमानात सुंदर हॉटेल तयार करण्यात आले आहे. ‘हवाई अड्डा’ असं या हॉटेलचं नाव असून अनेक पर्यटक या हॉटेलला आवर्जून भेट देतात.3 / 7पंजाबच्या लुधियाना शहरात असलेलं हे हॉटेल भारतातील पहिलं प्लेन रेस्टॉरन्ट आहे. 4 / 7लोकांना आकर्षित करणारं हे हॉटेल एका जुन्या विमानापासून तयार करण्यात आलं आहे. 5 / 7प्लेन रेस्टॉरन्ट ही अद्भुत संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी परमजित सिंह लुथरा यांचा मोलाचा वाटा आहे. 6 / 7महाराजा एक्स्प्रेसला पाहून त्यांना प्लेन रेस्टॉरन्ट तयार करण्याची कल्पना सुचली. 7 / 7‘हवाई अड्डा’ या हॉटेलमध्ये बेकरी, कॅफे आणि एक पार्टी हॉलही आहे. या हॉटेलमध्ये केवळ शुद्ध शाकाहारी भोजन मिळतं. आणखी वाचा Subscribe to Notifications