heavy rain flood like situation in hyderabad 3 dead
हैदराबादमध्ये पावसाचा हाहाकार....पूरसदृश्य स्थिती...अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 7:47 PM1 / 9हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. 2 / 9 हैदराबाद महानगरपालिकेचे कर्मचारी शहरात जमा झालेले पाणी काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसले.3 / 9वादळी पावसामुळे पुढील सरकारी आदेश येईपर्यंत उस्मानिया विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.4 / 9मुसळधार पावसामुळे झालेल्या घराची भिंत पडल्याच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.5 / 9नायडू नगर भागातील पावसामुळे एका घराची भिंत कोसळून तिघे ठार झाले. यात एका चार महिन्याच्या चिमुरड्याचा आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे.6 / 9तर विजेच्या खांबानजीक असलेल्या वाहनाला स्पर्श केल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला. विजेच्या धक्क्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.7 / 9हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सांयकाळी ४.३० ते ८.३० च्या सुमारास सुमारे ६७.६ मिमी. इतका विक्रमी पाऊस पडला. 8 / 9 ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू केले असून मदत कार्य करण्यात येत आहे.9 / 9 हैदराबादमध्ये पावसाचे थैमान सुरू आहे आणखी वाचा Subscribe to Notifications