शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशात कुठे मिळतं सर्वात स्वस्त जेवण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 3:28 PM

1 / 8
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला. त्यातून देशात सर्वात स्वस्त आणि महाग जेवण कुठे मिळतं, याची आकडेवारी समोर आली.
2 / 8
झारखंडमध्ये सर्वात स्वस्त जेवण मिळतं. झारखंडमध्ये ५० रुपयांच्या आत एक व्हेज थाळी मिळते. ५० च्या आत जेवणाची थाळी मिळणारं झारखंड देशातलं एकमेव राज्य असल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो.
3 / 8
राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये एका व्हेज थाळीसाठी ५० ते ७५ रुपये मोजावे लागतात.
4 / 8
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओदिशामध्येही एक थाळी ५० ते ७५ रुपयांना मिळते.
5 / 8
केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये एका शाकाहारी ताटासाठी ७५ ते १०० रुपये लागतात.
6 / 8
बंगाल, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाममध्येही एका व्हेज थाळासाठी ७५ ते १०० रुपये मोजावे लागतात.
7 / 8
पंजाब, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेशातही एका ताटासाठी ७५ ते १०० रुपये द्यावे लागतात.
8 / 8
बिहार आणि त्रिपुरामध्ये एका व्हेज थाळीसाठी १०० पेक्षाही जास्त रुपये मोजण्याची तयारी हवी.