The highest temperature in India's 'this' place
भारतातील 'या' ठिकाणी असतं सर्वाधिक तापमान By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 4:01 PM1 / 6भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी असून हा भारतातील सर्वाधिक तापमान असलेल्या भागांपैकी एक आहे. भुवनेश्वर येथील तापमान अधिक असल्याने प्रचंड गरम होतं. 2 / 6आंध्रप्रदेशमधील तिरुपती हे अत्यंत महत्वाचं ठिकाण असून येथील तापमान हे 47 डिग्रीपर्यंत असतं. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. 3 / 6राजस्थानातील राजगडमध्ये वाळवंटजवळ असल्याने तापमान अधिक असते. या भागाचं तापमान 50 डिग्रीपेक्षाही अधिक असतं. 4 / 6अहमदाबाद हे गुजरातमधील अत्यंत महत्वपूर्ण शहर असून उन्हाळ्यात येथील तापमान हे अधिक असते. 5 / 6नागपूर हे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर असून येथील तापमान हे जास्त असते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. 6 / 6डालटनगंज हे झारखंडमधील जास्त तापमान असलेलं ठिकाण आहे. कोयल नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराचं तापमान हे 50 डिग्रीपर्यंत असतं. आणखी वाचा Subscribe to Notifications