Himachal Pradesh Election 2022: BJP lost power in Himachal by just 12036 votes, statistics revealed
Himachal Pradesh Election: धक्कादायक! फक्त 12036 मतांनी भाजपच्या हातून हिमाचलची सत्ता गेली, आकडेवारी आली समोर... By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 8:18 PM1 / 9 Himachal Pradesh Election: 8 डिसेंबर रोजी लागलेल्या विधानसभा निकालात भाजपने गुजरात पुन्हा काबीज केले तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये निकराची लढत झाली. या लढतीत काँग्रेसने बाजी मारली खरी, पण काही जागा अशा होत्या, जिथे फार तुरळक मतांनी विजय मिळाला. आम्ही तुम्हाला अशा 10 जागांबाबत सांगणार आहोत, जिथे काँग्रेसने कमी फरकाने निवडणूक जिंकली.2 / 9 या 10 जागांवर काँग्रेसला भाजपपेक्षा केवळ 12036 मते जास्त मिळाली आहेत. या 12036 मतांमुळे राज्यातील राजकीय चित्र बदलले आणि भाजपची संख्या 25 वर अडकली. या 10 जागा भाजपच्या गोटात आल्या असत्या तर राज्यातील राजकीय चित्र वेगळे दिसले असते. या निवडणुकीत भाजपला 25 तर काँग्रेसला 40 जागा मिळाल्या आहेत.3 / 9 1- भोरंज मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश कुमार अवघ्या 60 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे डॉ.अनिल धीमान यांचा पराभव केला. 2- शिलाई विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या हर्षवर्धन चौहान यांनी भाजपच्या बलदेव सिंह यांचा 382 मतांनी पराभव केला आहे. 3- सुजानपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या राजिंदर सिंह यांनी भाजपच्या रणजित सिंह राणा यांचा 399 मतांनी पराभव केला आहे. 4 / 9 4- रामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या नंदलाल यांनी भाजपच्या कौल सिंह यांचा अवघ्या 567 मतांनी पराभव केला आहे. 5- श्रीरेणुकाजी जागेवर काँग्रेसच्या विनय कुमार यांनी भाजपच्या नारायण सिंह यांचा 860 मतांनी पराभव केला आहे. 6- भट्टियात जागेवर काँग्रेसचे कुलदीप सिंग पठानिया यांनी भाजपच्या बिक्रम सिंग यांचा 1567 मतांनी पराभव केला.5 / 9 7- लाहौल स्पिती मतदारसंघात काँग्रेसचे रवी ठाकूर यांनी भाजपच्या रामलाल मार्कंडा यांचा 1616 जागांवर पराभव केला आहे. 8- नाहान मतदारसंघातून काँग्रेसचे अजय सोलंकी यांनी भाजपचे डॉ. राजीव बिंदल यांचा 1639 मतांनी पराभव केला आहे. 9- इंदोरा मतदारसंघातून काँग्रेसचे मलेंद्र राजन यांनी भाजपच्या रीता देवी यांचा 2250 मतांनी पराभव केला आहे. 10- जयसिंगपूर मतदारसंघातून काँग्रेसचे यादवंदर गोमा यांनी भाजपच्या रविंदर कुमार धीमान यांचा 2696 मतांनी पराभव केला आहे.6 / 9 टक्केवारीवर नजर टाकल्यास भाजपने 5% च्या फरकाने 8 जागा जिंकल्या आहेत, तर कँग्रेसने 15 जागा जिंकल्या आहेत. ज्या जागांवर विजयाचे अंतर 5 ते 10 टक्के आहे, तेथे भाजपने 7 तर काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत. हिमाचल प्रदेश निवडणुकीशी संबंधित आणखी एक मनोरंजक आकडा आहे. 7 / 9 यावेळी अवघ्या 37,974 मतांनी सरकार बदलले. टक्केवारीत पाहिल्यास ही संख्या पॉइंट नाइन (0.9) आहे. म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी. पण या पॉइंट नाइनने राज्याच्या सत्तेत बदल घडवून आणला. हिमाचल प्रदेशात केवळ 37,974 मतांनी सत्ताबदल झाला आहे. म्हणजेच भाजपला राज्यात काँग्रेसपेक्षा केवळ 37,974 मते जास्त मिळाली. 8 / 9 मात्र या मतांमुळे निवडणुकीत विजय मिळवून काँग्रेस विरोधातून सत्तेत आली आणि भाजप सत्तेतून बाहेर पडला. हिमाचल प्रदेश निवडणुकीशी संबंधित आकडेवारीचे विश्लेषण केल्यास या निवडणुकीत काँग्रेसला एकूण 18 लाख 52 हजार 504 मते मिळाली. तर भाजपला एकूण 18 लाख 14 हजार 530 मते मिळाली.9 / 9 टक्केवारीचा विचार करता हिमाचल प्रदेशात काँग्रेसला 43.9 टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला 43 टक्के मते मिळाली आहेत. गुरुवारी जेपी नड्डा यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. नड्डा यांनी त्यांच्या गृहराज्य हिमाचल प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल आभार मानले. आणखी वाचा Subscribe to Notifications