हिमाचलमध्ये पुन्हा बिघडणार हवामान, पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 10:23 PM
1 / 6 हिमाचल प्रदेशमधल्या किन्नोर जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली होती. त्यामुळे पूर्ण परिवहन व्यवस्था कोलमडून पडली होती. 2 / 6 पण अजूनही ही व्यवस्था रुळावर आलेली नाही. किन्नोरमधल्या अर्ध्या डझनांहून रस्ते अजूनही बर्फाखाली झाकलेले आहेत. 3 / 6 जिल्ह्यात अनेकांना पायीच प्रवास करावा लागत आहे. तसेच इतर ग्रामीण भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. 4 / 6 जिल्ह्यातील अनेक गावांमधले रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. शिमला, सोलन, सिरमोर, मंडी, कुल्लू, चंबा, किन्नोर आणि लाहोल स्पितीमधलं हवामान खराब राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5 / 6 लाहोल स्पितीमध्येही रस्ते बंद झाल्यानं हेलिकॉप्टरच्या द्वारे नागरिकांना मदत पुरवली जात आहे. 6 / 6 लाहोल स्पितीसाठी तीनदा उड्डाणं केली आहेत. अनेक रुग्णांना या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं शहरातील रुग्णालयात हलवण्यात येत आहे. आणखी वाचा