शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vikramaditya Singh : करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत विक्रमादित्य सिंह! जाणून घ्या, त्यांच्याविषयी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 2:29 PM

1 / 7
हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी विधानसभा संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
2 / 7
विक्रमादित्य सिंह म्हणाले की, माझी जबाबदारी जनतेप्रती आहे. एक वर्षाच्या घडामोडींमध्ये आमदारांचे दुर्लक्ष झाले. त्याचा आवाज दाबला गेला, असेही ते म्हणाले. दरम्यान, विक्रमादित्य सिंह यांच्याविषयी जाणून घ्या...
3 / 7
विक्रमादित्य सिंह हे शिमला ग्रामीणचे आमदार आहेत. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1889 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हिमाचल प्रदेशच्या बिशप स्कूलमधून झाले. यानंतर विक्रमादित्य सिंह यांनी 2011 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून हिस्ट्री ऑनर्समध्ये बीए केले.
4 / 7
2016 मध्ये विक्रमादित्य सिंह यांनी इतिहासात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. विक्रमादित्य सिंह यांना खेळावर विशेष प्रेम आहे. यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर हिमाचलचे प्रतिनिधित्व केले आहे. विक्रमादित्य सिंह यांनी 2007 साली ट्रॅप शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
5 / 7
विक्रमादित्य सिंह हे 33 वर्षांचे आहेत, ते माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. वीरभद्र सिंह यांच्या मृत्यूनंतर विक्रमादित्य सिंह यांना राजा करण्यात आले. विक्रमादित्य सिंह यांचा विवाह 8 मार्च 2019 रोजी मेवाडच्या अमेट संस्थानातील राजकुमारी सुदर्शना सिंह यांच्याशी झाला आहे.
6 / 7
विक्रमादित्य सिंह यांची पत्नी राजकुमारी सुदर्शना सिंह यांनी मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून समाजशास्त्रात मास्टर्स केले आहे. इतकंच नाही तर सुदर्शना सिंह यांनी इंटिरियर डिझायनिंगचा कोर्सही केला आहे. सुदर्शना सिंह या मूळच्या उदयपूरच्या आहेत.
7 / 7
विक्रमादित्य सिंह यांच्याकडे 101 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तसेच, विक्रमादित्य सिंह यांच्याकडे काही गाड्या आहेत. याशिवाय, त्यांच्यावर सुमारे 1 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज आहे.