शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ग्लॅमर, गन आणि अफेअर..., काँग्रेस नेत्या हिमानी नरवालच्या सोशल मीडिया अकाउंटमधून अनेक गुपितं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:55 IST

1 / 6
हरयाणामधील रोहतक येथील काँग्रेसच्या महिला नेत्या आणि सोशल मीडिया इनन्फ्लुएंसर हिमानी नरवाल हिचा सुटकेसमध्ये भरलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. तसेच तिच्या हत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच पोलिसांनी या प्रकरणी हिमानीचा प्रियकर असलेल्या सचिन याला अटक केली आहे.
2 / 6
राजकारण आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या हिमानी हिच्या सोशल मीडिया अकाउंटमधून तिच्याशी संबंधित अनेक गुपितं उघड झाली आहेत. हिमानी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिची लाईफस्टाईल आणि राजकीय कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सातत्याने शेअर करत असे. तिच्या इन्स्टाग्राम आणि फेसबूक प्रोफाइलमधून हिमानी हिला ग्लॅमरस लाईफस्टाईल, महागडे ब्रँड्स आणि पिस्तुलांसोबत फोटो काढण्याची आवड होती, असे समोर आले आहे.
3 / 6
हिमानी नरवाल ही कांग्रेसची रोहतक ग्रामीण विभागाची जिल्हा उपाध्यक्ष होती. तसेच ती काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय असायची. तसेच तिचे काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर आहेत. त्यामध्ये राहुल गांध, भूपेंद्र सिंह हुड्डा, दीपेंद्र हुड्डा या नेत्यांसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत. तसेच हिमानी नरवाल हिचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्सही होते.
4 / 6
हिमानी नरवाल हिचे मित्रांसोबतचे नाईट क्लब आणि चित्रपट गृहांमधील अनेक फोटोही इन्स्टाग्रामवर आहेत. त्याबरोबरच हिमानी ही कसौली आणि गोव्यामध्ये फिरायला नियमितपणे जात असे. तसेच अनेक अभिनेते आणि कलाकारांसोबतचे फोटोही तिने सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केलेले आहेत. यश टोंक, गजेंद्र चौहान, जुही बब्बर या कलाकारांसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर आहेत.
5 / 6
हिमानी नरवाल ही इन्स्टाग्रामवर आपल्या कुटुंबीयांसोबतचे फार कमी फोटो अपलोड करायची. कधी कधी ती आपल्या भावासोबतचे फोटो सोशल मीडियावर अपडोल करायची. तिचा भाऊ भारतीय नौदलामध्ये सेवेत आहे. तसेच एकदा आजीसाठी खरेदी केलेली हिऱ्यांची अंगठीही एका फोटोमध्ये दाखवताना दिसत आहे.
6 / 6
दरम्यान, हिमानी नरवाल हिच्या हत्येप्रकरणी सचिन नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईलचं दुकान चालवणाऱ्या सचिनची फेसबुकच्या माध्यमातून हिमानी हिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये नातं प्रस्थापित झालं होतं. सचिन हा विवाहित असून, त्याला दोन मुलं आहे. दरम्यान, सचिनने हिमानी हिला काही पैसे दिले होते. ते परत मागितल्यावर हिमानी हिने नकार दिला होता. त्यामुळे आपण तिची हत्या केली असे सचिनने सांगितले आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाcongressकाँग्रेस