historical photographs of Indians elections
कशा होत्या पूर्वी निवडणुका? पाहा निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक छायाचित्रे By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 2:55 PM1 / 61991 मध्ये राजीव गांधी मुंबईतील एका सभेला संबोधित करतानाचा हा फोटो, 1991 मध्ये अल्पमतात काँग्रेसने देशात सत्ता मिळवली होती. याचदरम्यान 21 मे रोजी प्रचार करताना तामिळनाडू येथे राजीव गांधी यांची हत्या झाली होती. 2 / 61984 लोकसभा निवडणुकीत बॉलिवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन यांनी इलाहाबाद(प्रयागराज) येथून निवडणूक लढवली होती. दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी अमिताभ याठिकाणहून खासदार म्हणून निवडून गेले. मात्र तीन वर्षात त्यांनी राजकारणाला राम राम करत खासदारकीचा राजीनामा दिला. 3 / 61984 च्या लोकसभा निवडणुकीवेळी वांद्रे पाली हिल येथे एका मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभा असणारा हे आहेत अभिनेते ऋषि कपूर 4 / 6निवडणुकींचा निकाल लागतो तेव्हा आता घरबसल्या टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून पाहता येतं, मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावलेल्या स्क्रीनवर निकाल लावला जातो. 1980 साली नवी दिल्लीतील टाइम्स ऑफ इंडिया कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला हा निकाल पाहा5 / 6ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्योती बासु यांच्यासोबत. त्यावेळी ममता यांच्याकडे खेळ आणि बाल कल्याण विभागाचा कार्यभार होता. 23 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून बासु यांनी काम सांभाळलं. इतका वेळ मुख्यमंत्री पद सांभाळणारे ज्योती बासु हे देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत. 6 / 614 मार्च 2000 रोजी काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरताना अभिनेता दिलीप कुमार हे तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांच्यासोबत. दिलीप कुमार 2000 ते 2006 पर्यंत राज्यसभा खासदार होते. आणखी वाचा Subscribe to Notifications