शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लय भारी! या महिलेनं रचला इतिहास; राफेलच्या पहिल्या फायटर पायटल होण्याचा मिळवला मान

By manali.bagul | Published: September 23, 2020 7:44 PM

1 / 8
फ्रान्सकडून मागविलेल्या फायटर विमान राफेलची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते. त्यावेळीदेखील हे विमान कोण चालवणार याविषयी उत्सुकता होती. आता त्याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे.
2 / 8
भारतीय वायु सेनेत महिला फायटर पायलटांची भर्ती सुरू झाल्यानंतर राफेल विमानातून झेप घेण्याचा मान शिवांगीला मिळाला आहे. शिवांगी ही बनारसची रहिवासी आहे. विशेष म्हणजे भारतीय वायू सेनाच्या राफेल स्क्वाड्रनची पहिली महिला फायटर होण्याची संधी मिळाली आहे. आता वायूसेनेकडून फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह राफेल विमानातून झेपावेल.
3 / 8
दैनिक जागरणला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान शिवांगीने सांगितले की, ''मी विमान चालवावं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं.''
4 / 8
तसंच शिवांगीचे वडील कुमारेश्वर सिंह यांनी सांगितले की, ''आम्हाला गर्व आहे की शिवांगी बनारससह देशाचं नाव मोठं करेल.''
5 / 8
शिवांगीने २०१३ ते २०१६ पर्यंत बीएचयूमधून एनसीसीचं प्रशिक्षण घेतलं आणि सनबीम भगवानपूर येथून बीएससी केलं. २०१७ मध्ये महिला लढाऊ पायलट्सच्या दुसऱ्या बॅचमध्ये भारतीय वायू सेनामध्ये प्रवेश मिळाला होता.
6 / 8
वाराणसी जिल्ह्याची मूळ निवासी फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह सध्या प्रशिक्षण घेत आहे. आता शिवांगी अंबालामध्ये १७ स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये सामील होईल.
7 / 8
२०१७ मध्ये वायू सेनेत सहभागी झाल्यानंतर शिवांगी सिंह मिग-21 बाइसन चालवत होती. शिवांगी सिंह हिने विंग कमांडर अभिनंदन वर्थमान याच्यासोबतही काम केलं आहे.
8 / 8
(Image Credit- Live Hindustan Times)
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलfighter jetलढाऊ विमानIndiaभारत