शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zomato Case: बंगळुरू सोडलं नाही, पोलिसांनाही सहकार्य; डिलिव्हरी बॉयवर मारहाणीचा आरोप केलेल्या हितेशाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 5:45 PM

1 / 15
Zomato वरून मागवलेलं जेवण उशिरानं आल्यानं एका तरूणीनं (hitesha chandranee) ते रद्द केले म्हणून चिडून डिलिव्हरी बॉयनं (Zomato Delivery boy hit on nose) आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा दावा त्या महिलेनं केला होता.
2 / 15
परंतु त्यानंतर अटक केलेल्या झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कामराजनं पोलिसांना चौकशीमध्ये आपली बाजू सांगितल्याचंही समोर आलं होतं. यामध्ये आता पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला होता.
3 / 15
संबंधित तरूणीवर पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून तिच्यावर डिलिव्हरी बॉयसोबत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
4 / 15
दरम्यान, यानंतर हितेशा चंद्राणी हीनं पोलिसांच्या तपासापासून वाचण्यासाठी बंगळुरू सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
5 / 15
परंतु या अफवा असून आपण बंगळुरू सोडलं नसल्याचा दावा हितेशा चंद्राणीनं केला आहे. तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तसंच आपल्या सुरक्षेबाबत आपल्याला चिंता वाटत असल्याचं तिनं म्हटलं आहे.
6 / 15
आपण पोलिसांना चौकशीत सहकार्य करत आहोत आणि आपण बंगळुरूदेखील सोडलं नसल्याचं तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
7 / 15
बंगळुरू आपल्यासाठी घराप्रमाणे आहे. मला त्रास दिला गेला, माझ्यासोबत गैरवर्तणूकही झाली, मला धमकीही दिली गेली असा दावा तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला आहे.
8 / 15
या घटनेनंतर माझं नाक फ्रॅक्चर झालं होतं. मला माझ्या नाकावरही उपचार करावे लागले. माझ्या विरोधात अनेकांनी अपमानजनक आणि धमकी देणाऱ्या शब्दांचा वापर करत फोनही केल्याचं तिनं नमूद केलं आहे.
9 / 15
यापूर्वी झोमॅटो बॉयच्या तक्रारीवरून तरुणीवर एफआयआर दाखल करण्यात आलं होतं. तरूणीनं झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारलं, त्याला शिवीगाळही केला आणि नंतर त्याचाच विरोधात खोटी तक्रार दाखल केली असं तक्रारीत नमूद केलं होतं.
10 / 15
झोमॅटो आणि मॉडेलमधील वाद वाढल्यानंतर कंपनीकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. झॉमेटो कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडियावर या प्रकरणी म्हणणं मांडलं आहे. झोमॅटो कंपनीकडून हितेशा हीचा वैद्यकीय खर्च उचलला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
11 / 15
हितेशासह कंपनी कामराज याच्याशी सुद्धा संपर्कात आहे. नियमानुसार, कामराज याला निलंबित करण्यात आलं आहे, असे दीपेंद्र गोयल यांनी सांगितलं होचं. एवढंच नव्हे, तर कामराज याचा न्यायालयीन खर्चही उचलला जात आहे, असं गोयल यांनी नमूद केलं होतं.
12 / 15
कामराजनं गेल्या २६ महिन्यांत ५ हजारांहून अधिक ठिकाणी पार्सल डिलिव्हरी केली आहे. झोमॅटो कंपनीत कामराजला ४.५७ असे उत्कृष्ट रेंटिंग ग्राहकांकडून देण्यात आलं आहे.
13 / 15
या प्रकरणात नेमकं काय घडलं, सत्य काय आहे, याचा शोध झोमॅटो घेणार आहे, असंही दीपेंद्र गोयल यांनी सांगितलं होतं.
14 / 15
पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. मी त्यांची त्यासाठी माफी मागितली. रस्ता खराब आणि वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशिर झाला, असं कामराजने त्यांना सांगितलं.
15 / 15
तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झालीय, ठोसा लगावल्यामुळे नाही, असं कामराज यानं चौकशीदरम्यान सांगितलं होतं.
टॅग्स :ZomatoझोमॅटोIndiaभारतKarnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरonlineऑनलाइनfoodअन्नPoliceपोलिस