शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rishab Pant: पंतला वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरचा सन्मान, VVS लक्ष्मणनेही केला सॅल्यूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 9:37 AM

1 / 11
भारतीय क्रिकेट संघाच फलंदाज ऋषभ पंत आपल्या आईला भेटण्यासाठी मूळ गावी रुरकी येथे जात असताना अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मंगलौरमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.
2 / 11
हरयाणा परिवहन मंडळाचा बसचा चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी ऋषभला जळत्या मर्सिडीज बेंझमधून बाहेर पडण्यास मदत केली, असे हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजय सिंग यांनी सांगितले.
3 / 11
ऋषभ पंतला भीषण अपघातामधून वाचवणाऱ्या हरियाणा परिवहन महामंडळाच्या बस चालक आणि वाहकाचा पाणीपत डेपोकडून सत्कार करण्यात आला आहे. सुशील मान आणि परमजीत सिंग अशी या दोघांनी नावे आहेत.
4 / 11
रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला तेव्हा त्याला पहिल्यांदा बस ड्रायव्हरने मदत केली होती. सुशील कुमार नावाच्या बस ड्रायव्हरने रक्तबंबाळ झालेल्या लंगडत लाचणाऱ्या रिषभला हात दिला.
5 / 11
अॅम्बुलन्स बोलवून त्याला हॉस्पिटलला पाठविले. परंतू जेव्हा रिषभची कार डिव्हायरवरून पलिकडे कोसळली तेव्हाचा क्षण एवढा भयानक होता की त्या बस ड्रायव्हरने आशाच सोडलेली.
6 / 11
सुशील कुमार हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. तो हरिद्वारहून येत होता. नारसनजवळ येताच दिल्लीवरून येणारी एक कार ६०-७० च्या वेगाने डिव्हायडरला आदळल्याचे त्याने पाहिले. डिव्हायडरवरून जंप करून ही कार पलिकडल्या रस्त्यावर आदळली व घसरू लागली होती, असे त्या ड्रायव्हरने सांगितले.
7 / 11
ही कार आमच्या बसच्या अगदी समोर आली. बसला आदळणार असे वाटत होते. आदळली तर आम्ही कोणाला वाचवू शकणार नाही, असा विचारही मनात आला. कारण कार आणि बसमध्ये ५० मीटरचे अंतर होते. तेवढ्याच अंतरात बस थांबवायची होती. तितक्यात मी सर्विस लाईनवरून बस पहिल्या लेनमध्ये नेली अन् कार दुसऱ्या लेनमधून मागे गेली. अर्जंट ब्रेक मारला आणि बस मधून उडी टाकून कारकडे धाव घेतली, असे सुशील कुमारने सांगितले.
8 / 11
कारमधून एक व्यक्ती रस्त्यावर पडला होता. अंगावर कपडे नव्हते. मला वाटले तो वाचण्याची शक्यता नाहीय. कारमधून स्पार्क होऊ लागले होते. आम्ही त्याला उचलले आणि कारपासून दूर नेले. कारमध्ये आणखी कोणी आहे का हे त्याला विचारले. तेव्हा त्याने मी एकटाच असल्याचे सांगितले.
9 / 11
तो म्हणाला मी रिषभ पंत आहे.... मी क्रिकेट फारसे पाहत नाही, यामुळे मला माहिती नव्हतो तो टीम इंडियाचा स्टार प्लेअर होता ते, आम्ही त्याला चादरीत लपेटले, असे सुशील कुमार म्हणाला.
10 / 11
बस पाणीपत येथे पोहोताच या कार्याबद्दल पाणीपत डेपोने सुशील मान आणि परमजीत सिंग यांचा सत्कार केल्याची माहिती डेपोचे व्यवस्थापक कुलदीप झांगरा यांनी दिली. तसेच हरियाणा परिवहन विभागाचे मुख्य सचिव नवदीप सिंग यांनीही दोघांचे कौतुक केलं. आम्हाला दोघांचाही अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
11 / 11
दरम्यान, टीम इंडियाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनेही ट्विटरवरुन सुशील कुमार यांचा फोटो शेअर केला आहे. तसेच, आपण निस्वार्थी सेवाभाव जपला त्याबद्दल आपले आभार, तुम्हीच रिअल हिरो आहात, असेही त्याने म्हटले.
टॅग्स :Rishabh Pantरिषभ पंतTeam Indiaभारतीय क्रिकेट संघhospitalहॉस्पिटलHaryanaहरयाणाBus Driverबसचालक