शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्वसामान्यांना दिलासा! स्वस्तात घर बनणार, नव्या कारच्या किंमतीही घटणार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 4:13 PM

1 / 9
स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने आता घर बांधणे स्वस्त होणार आहे. अलीकडच्या काळात स्टील आणि सिमेंटचे दर झपाट्याने वाढत होते, पण आता दोन्ही वस्तूंच्या महागाईला ब्रेक लागला आहे. एका अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत स्टीलच्या किमतीत ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
2 / 9
सध्या त्याचा दर ५७००० रुपये प्रतिटन आहे. एक दर देशांतर्गत बाजारपेठेत आहेत. स्टील निर्यातीत घट झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात किमतीत घट दिसून येत आहे. सरकारने स्टीलवर १५ टक्के एक्सपोर्ट टॅक्स लावला आहे, ज्यामुळे निर्यात कमी झाली आहे.
3 / 9
स्टीलच्या किमती घसरल्याचा फायदा अनेक क्षेत्रात दिसून येईल. स्टील बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती अलीकडे झपाट्याने वाढल्या होत्या. स्टीलच्या किमतीत झालेली वाढ हे त्याचे कारण होते. आता किमती कमी होत आहेत त्यामुळे बाकी वस्तूही स्वस्त होतील. बांधकामात मग ते घर असो वा रस्ता, पुल-कल्व्हर्ट, त्यात स्टीलचा सर्वाधिक वापर केला जातो. याशिवाय कारच्या निर्मितीमध्येही स्टीलचा वापर केला जातो.
4 / 9
स्टील महाग असल्याने त्यांची किंमत काही महिन्यांपासून वाढली होती. मात्र जेव्हापासून सरकारने स्टीलवर निर्यात कर लावला, तेव्हापासून दर घसरत आहेत. २०२२ च्या सुरुवातीला हॉट रोल्ड कॉइल म्हणजेच HRC च्या किमतीत वाढ झाली होती.
5 / 9
या वाढीमुळे उद्योगांना सर्वात जास्त काळजी वाटली कारण अनेक कामांमध्ये स्टीलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे रिअल इस्टेट, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, बांधकाम, ऑटोमोबाईल आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये वापरले जाते. स्टीलच्या किमती वाढल्याने या सर्व क्षेत्रातील कच्च्या मालाची किंमत वाढली.
6 / 9
या वर्षी एप्रिलमध्ये देशाच्या स्थानिक बाजारपेठेत स्टीलची किंमत ७८,८०० रुपये टनांवर पोहोचली. यावर १८% जीएसटी जोडल्याने ही किंमत प्रति टन ९३००० रुपये झाली. मात्र, एप्रिलच्या अखेरीपासून स्टीलच्या किमतीत घसरण सुरू झाली आणि जूनमध्ये ही किंमत ६०२०० रुपये प्रति टनावर पोहोचली. स्टीलमिंटने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये मोठी घसरण झाली आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत स्टीलच्या किमती ५७००० रुपये प्रति टनपर्यंत खाली आल्या.
7 / 9
किमती कमी होण्यामागील कारणांबाबत स्टीलमिंटने म्हटले आहे की, स्टील उत्पादनांवरील सरकारचा कर, परदेशात स्टीलची घटती मागणी आणि महागाईत वाढ तसेच ऊर्जा खर्चात झालेली वाढ यामुळे किंमती घसरल्या आहेत. नमूद केलेल्या किंमतीमध्ये GST समाविष्ट नाही, त्यामुळे ही किंमत १८% नुसार जास्त असेल.
8 / 9
पुढील तिमाहीत स्टीलच्या किमतीत घसरण कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत स्टीलची निर्यात सामान्यपेक्षा कमी होईल, त्यामुळे किमतीत आणखी घसरण होईल. स्टीलची वाढती महागाई लक्षात घेऊन सरकारने २१ मे रोजी लोह खनिजाच्या निर्यातीवरील कर ५० टक्क्यांनी वाढवला.
9 / 9
उर्वरित स्टील वस्तूंवर निर्यातीवरील कर १५% वाढविला गेला. या काळात कोकिंग कोळसा आणि फेरोनिसेलसह काही कच्च्या मालाच्या आयात शुल्कात सूट देण्यात आली होती. पोलाद उद्योगात या कच्च्या मालाची गरज असते. देशांतर्गत उत्पादकांना कच्च्या मालाची कमतरता भासू नये म्हणून ही पावले उचलण्यात आली.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन