how to apply online registration of voter
मतदारयादीत नाव नोंदवायचं आहे का ?....ही आहे ऑनलाइन प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 5:38 PM1 / 5मतदारयादीत नाव नोंदवावं यासाठी निवडणूक आयोग नेहमीच जनजागृती मोहीम राबवत असतं. पण तुमच्या माहितीसाठी ऑनलाइन पद्धतीनेही तुम्ही सहज नाव नोंदवू शकता. आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जाणून घ्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कशी आहे...2 / 5मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला आधी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जावं लागेल. तिथे गेल्यावर नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलच्या लिंकवर क्लिक करा. या पोर्टलवर तुम्हाला 'अप्लाय ऑनलाइन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू व्होटर' या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. 3 / 5यानंतर तुमच्यासमोऱ फॉर्म 6 येईल, ज्यामध्ये तुम्हाला महत्वाची माहिती भरावी लागेल. ज्याप्रमाणे तुमचा विधानसभा मतदारसंघ, जिल्हा वैगेरे. याशिवाय तुम्हाला तुमची स्वत:ची ओळख सांगावी लागेल. 4 / 5फॉर्म 6 वर तुम्हाला महत्वाची कागदपत्रे अपलोड करणं गरजेचं आहे. फोटो, वयाचा पुरावा आणि पत्ता. यानंतर आपल्या जन्मठिकाणाची माहिती दिल्यानंतर तुम्ही सबमिट करु शकता.5 / 5यानंतर तुम्हाला रेफरन्स आयडी मिळेल, ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचं अॅप्लिकेशन स्टेटस ट्रॅक करु शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications